Saturday, March 2, 2024

वाढदिवशी बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, ‘कांगुवा’ चित्रपटातील अभिनेत्याचा खतरनाक लूक समोर

शिव दिग्दर्शित सुर्याचा आगामी चित्रपट ‘कंगुवा’ हा 2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एक काल्पनिक ॲक्शन ड्रामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाला संपूर्ण भारतातील प्रेक्षक मिळतील अशी अपेक्षा आहे. नुकतेच या चित्रपटातील सूर्याचे पोस्टर रिलीज करण्यात आले.

जे पाहून चाहत्यांची उत्कंठा वाढली. त्याचबरोबर आता निर्मात्यांनी या चित्रपटातील खलनायकाचा लूकही प्रेक्षकांना दाखवला आहे. या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलचे (Bobby deol) पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले असून, त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी भेट आहे.

सिरुथाई सिवा दिग्दर्शित ‘कंगुवा’ मनोरंजनाने परिपूर्ण आहे. या चित्रपटात मानवी भावना, दमदार कामगिरी आणि याआधी कधीही न पाहिलेले ॲक्शन सीन मोठ्या प्रमाणावर आहेत. ‘कांगुवा’ या संपूर्ण भारतीय चित्रपटाचे काम वेगाने सुरू आहे, ज्याबद्दल चित्रपटाची संपूर्ण टीम उत्सुक आहे. सुर्याने नुकतेच त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

सुर्या आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव यांनी केले आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटातील इतर स्टारकास्ट येत्या काळात समोर येणार आहेत. ‘कांगुवा’चे निर्माते हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. यासह, हा चित्रपट 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल, जो अनेक प्रदेशांमध्ये लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. हा चित्रपट यावर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘विकी नसता तर कदाचित मी काही करू शकले असते…’, अंकिता लोखंडेने पतीला खोटे पाडत केला खुलासा
पीच कलरच्या ड्रेसमध्ये मिथिला पालकरचा जलवा, पाहा सुंदर फोटो

हे देखील वाचा