बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) १४ जून २०२० रोजी त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला. आज सुशांतची पुण्यतिथी आहे. त्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचे चाहते आणि त्याची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने त्याची आठवण काढली. अशा परिस्थितीत, श्वेता सिंग कीर्तीने आपल्या भावाची आठवण करून देणारी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अतिशय सुंदर आणि भावनिकही आहे.
श्वेता सिंग राजपूतने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिचा भाऊ एका लहान मुलाचा हात धरताना दिसत आहे. खरंतर सुशांतचा हा फोटो त्यावेळचा आहे, जेव्हा अभिनेता एका कार्यक्रमात पोहोचला होता. त्यादरम्यान त्याने फुगे विक्रेत्यांसोबत सेल्फी काढला होता आणि गप्पाही मारल्या होत्या. सुशांत किती डाउन टू अर्थ होता, हे सर्वांनाच माहीत आहे. तो कधीच कोणात भेद करत नसे. (sushant singh rajput sister shweta singh kirti shared beautiful post)
सुशांत तसाच सगळ्यांमध्ये मिसळायचा, जसा तो इतर कलाकारांसोबत मिसळत असे. सुशांत त्याच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी अनेकदा बोलायचा. एकदा सुशांतने त्याच्या चाहत्यांना जाऊन त्याचा चित्रपट पाहण्याची विनंती केली होती. दरम्यान सुशांत जाऊन दोन वर्षे झाली आहेत, पण तरीही तो आपल्यात यावर लोकांचा विश्वास बसणे कठीण आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा