सुष्मिता सेनच्या मुलीने ‘खऱ्या आई’बद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिले सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाली, ‘मला काहीच…’


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशासाठी एक आदर्श आई आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरून त्यांच्या फॅमिलीमधील बॉंडिंग प्रेक्षकांना दिसत असते. या दोन्ही मुली सुष्मिताने दत्तक घेतलेल्या मुली आहेत. एका मुलाखतीत रेनीला विचारले होते की, त्यांना तिच्या खऱ्या आईबद्दल जाणून घ्यायचे आहे, तेव्हा तिने अत्यंत हैराण करणारे उत्तर दिले.

पीपिंगमूनला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा तिला हा प्रश्न विचारला, तेव्हा तिने उत्तर दिले की, “मला माझ्या इंस्टाग्रामवर देखील असे प्रश्न विचारले जातात की, तुझी खरी आई कोण आहे?? कृपया मला तुम्हीच सांगा खरी आई म्हणजे नक्की काय असतं.” (Sushmita Sen’s daughter Renee sen give answer when ask her about real mother)

रेनीने पुढे सांगितले की, “हे बघा मला माहीत आहे की, लोकांना आमच्या आयुष्यात खूप रस असतो. परंतु मला वाटते की, लोकांनी इतरांबाबत चांगला विचार केला पाहिजे. माझे खरे सगळ्यांसमोर आहे. पण जर मी इतर कोणी असले, तरीही काय फरक पडतो? मला माहित नाही की, हे त्यांना कसे प्रभावित करेल पण मला असे वाटते की, आपण जरा संवेदनशील असावे. माझ्यासाठी ही गोष्ट वेगळी आहे कारण मी त्याच्यासोबत मोठी झाली आहे. मला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. परंतु इतर कोणासाठी जे त्यांचं आयुष्य वैयक्तिक ठेवू इच्छितात ते कसे काय या प्रश्नापासून प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे हे असे प्रश्न तोपर्यंत विचारू नका जोपर्यंत एखादा व्यक्ती तुम्हाला स्वतःहून काही सांगत नाहीत.”

काही दिवसांपूर्वी रेनीने इंस्टाग्रामवर, ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले होते. यावेळी तिने अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. त्यावेळी युजरने तिला विचारले होते की, तुझी खरी आई कोण आहे?? यावेळी तिने उत्तर दिले होते की, “मी माझ्या आईच्या हृदयातून जन्म घेतला आहे आणि हेच खरे आहे.” तिच्या या उत्तराने सगळेच खूप प्रभावित झाले होते. सर्वांनी तिचे खूप कौतुक केले होते.

सुष्मिता सेनची मुलगी रेनी सेनला देखील तिच्या आईप्रमाणे बॉलिवूडमध्ये तिचे नाव कमवायचे आहे. त्यासाठी ती खूप मेहनत करत आहे. एक स्टारकीड असल्याने रेनीचे सोशल मीडियावर चांगलीच फॅन फॉलोविंग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रेनीने अभिनयातील करिअरची सुरुवात शॉर्ट फिल्म ‘सुट्टाबाजी’ मधून केली आहे. तसेच मुलाखतीत तिने सांगितले होते की, ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.