बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझेन खानही मागील काही दिवसांपासून इंस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे खूपच चर्चेत आहे. तिने नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिची मेहनत स्पष्टपणे दिसत आहे. बॉलिवूडमध्ये फिटनेसची गुरु मानली जाणारी अभिनेत्री मलायका अरोराने देखील तिचे कौतुक केले आहे. तिने हा व्हिडिओ लाईक करून त्यावर कमेंट देखील केली आहे.
हा व्हिडिओ शेअर करून सुझेनने लिहिले आहे की, “खाली पडा आणि पुन्हा उभे रहा, खाली उतरून पुन्हा उडी घ्या. सरावाने तुम्ही खूप चांगले काम करू शकता.” मलायका अरोराने तिचा हा व्हिडिओ लाईक केला आहे आणि मसलची ईमोजी पोस्ट करून कमेंट देखील केली आहे.
या व्हिडिओमध्ये ती जिम ड्रेसमध्ये दिसत आहे. ऋतिकच्या अनेक चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. सुझेन नेहमीच तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने मागे तिचा मुलगा रिहान याच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
ऋतिक आणि सुझेन यांना रिदान आणि रेहान अशी दोन मुले आहेत. त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. पण दोघेही मिळून त्यांच्या मुलांचे पालन करत आहेत. अनेक वेळा त्यांना त्याच्या मुलांसोबत फिरताना पाहिले आहे. घटस्फोट झाला असला, तरीही त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील ते एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज