अभिनेता सुयश टिळक २०२० मध्ये लग्न बंधनात अडकला आहे. त्याने आयुषी भावेसोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच या नवीन जोडप्याची लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी झाली आहे. या रोमँटिक जोडीचे अनेक फोटो आपण पाहिले आहेत. लग्नानंतर एकत्र घेतलेले देव दर्शन तसेच बाकी सगळ्या सगळ्या समारंभाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच त्यांनी त्यांच्या पहिल्या संक्रांतीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
आयुषीने (Ayushi bhave) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सुयशसोबत (suyash tilak) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, आयुषीने लाल रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. तसेच तिने सगळा साज-शृंगार केला आहे. तसेच सुयशने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूप खुश दिसत आहेत. हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कणभर तिळ मनभर प्रेम. गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा.. तिळगूळ घ्या गोडगोड बोला.” (Suyash tilak and ayushi bhave photo viral on social media)
त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळे त्यांच्या या पोस्टवर कमेंट करून अनेकजण त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत.
सुयश आणि आयुशीने त्यांच्या नात्याबाबत खूप गुप्तता पाळली होती. त्यांनी साखरपुडा करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
याआधी सुयश ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरसोबत रिलेशनमध्ये होता. त्यांचे एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती. सुयशने अनेक मालिका आणि चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही दिवसांपूर्वी तो ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत काम करत होता. मालिकेत त्याच्यासोबत सायली संजीव ही मुख्य भूमिकेत होती.
हेही वाचा :