Saturday, September 30, 2023

कोण आहे ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम? कॉंग्रेसने अभिनेत्रीला दिलं उमेदवारीचं तिकीट

उत्तर प्रदेशमध्ये सध्या निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांनी त्यांच्या १२५ उमेदवारांची यादी जाहिर केली, ज्यामधून कॉंग्रेसने ४० टक्के महिलांना तिकिटे दिल्याचे समजत आहे. या यादीमध्ये सर्वांचं लक्ष वेधलंय ते म्हणजे अभिनेत्री अर्चना गौतमने (Archana Gautam). अर्चनाला मेरठमधील हस्तिनापूर मतदार संघातुन उमेदवारी मिळाली आहे. कोण आहे ही अर्चना जिची इतकी चर्चा रंगली आहे, चला जाणून घेऊया…

अर्चना गौतम एक अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेती आहे. तिने २०१४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स उत्तर’ प्रदेशचा किताब जिंकला होता. यानंतर ती ‘मिस बिकिनी इंडिया’, ‘मिस बिकीनी यूनिवर्स इंडिया’, आणि ‘मिस बिकिनी यूनिवर्सची’ विजेती ठरली होती. सोबतच तिने २०१८ मध्ये कॉसमॉस वर्ल्ड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. (actress archana gautam fight up election 2022 from congress)

अर्चनाने मेरठमधील IIMT मधून BJMC मध्ये पदवी मिळवली आहे. इतकेच नव्हे, तर तिने मोस्ट टॅलेंट २०१८ची विजेती होण्याचा मान मिळवला आहे. अर्चनाने २०१५ मध्ये बॉलिवूड कारकिर्दिला सुरुवात केली होती. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिला बिकीनी गर्ल म्हणुनही ओळखतात. मलेशामध्ये मिस टॅलेंट २०१८ची विजेती ठरल्यानंतर तिचं सर्वत्र कौतुक झालं होतं. हा संपुर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण होता. ब्युटी पेजेंट जिंकल्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवले. सोबतच ती अनेक जाहिरातींंमध्ये ही झळकली आहे.

अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि आफताब शिवदसानी यांच्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ चित्रपटाद्वारे तिने आपल्या बॉलिवूड कारकिर्दिला सुरुवात केली होती. हा चित्रपट चांगलाच यशस्वी ठरला होता. यानंतर ती श्रध्दा कपूरच्या ‘हसिना पारकर’ आणि ‘बारात कंपनी’ चित्रपटांमध्येही दिसली होती.

साल २०१९मध्ये आलेल्या ‘जंक्शन वाराणसी’मध्ये अर्चनाने एक आयटम नंबरही केलं आहे. या व्यतिरिक्त तिने टी सीरीजच्या म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. या गाण्याचं दिग्दर्शन अपूर्व लाखियाने केले होते. ती अनेक हरियाणी आणि पंजाबी गाण्यातही दिसली आहे.

बॉलिवूडमध्ये नशिब आजमावल्यानंतर आता अर्चना दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. ती ‘IPL Its Pure Love’ नावाच्या तेलुगू आणि ‘Gundas’ आणि ’47A’ या तमिळ चित्रपटात काम करणार आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अर्चनाने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक नामांकित पुरस्कारही तिच्या नावावर आहेत. २०१८ मध्ये तिला ‘Dr. Radhakrishnan Memorial Award’ ने सन्मानित केले होते. तसेच त्याचवर्षी तिला मनोरंजन क्षेत्रातील योगदानासाठी ‘Women Achiver Award by GRT’ पुरस्कार देण्यात आला होता. अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवणारी अर्चना आता राजकारणात किती छाप पाडते हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे!

हेही वाचा :

हे देखील वाचा