कामाला सलाम! स्वराने केला मुलाला कडेवर घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ शेअर

Swara bhaskar share a ladies constable video on social media, on duty she also handeling her baby


बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ हिला सोशल मीडियावर सक्रिय राहायला खूपच आवडते. समाजात चालणाऱ्या अनेक गोष्टी समजून घेऊन त्यावर सारासार विचार करून ती त्यावर तिचं मत व्यक्त करताना बऱ्याचवेळा दिसत असते. समाजातील अनेक घटकांवर विचार करण्यासोबतच ती अनेक प्रेरणादायी पोस्टही चाहत्यांसाठी टाकत असते.

स्वराचा जन्म 9 एप्रिल 1988 मध्ये दिल्ली येथे झाला होता. तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण सामजिक शास्त्र या विषयात पूर्ण केले. म्हणूनच समाजातील अनेक घटकांचा ती बारकाईने विचार करत असते.

सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याने ती अनेक गोष्टींवर परखड भाष्य करते. नुकताच तिने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्या व्हिडिओला पाहून तुम्ही त्या व्हिडिओचे कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकणार नाही.

स्वरा भास्कर हिने गगनदीप सिंग या ट्विटर युजरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला पोलीस अधिकारी प्रियंका ही आपल्या लहान मुलाला उचलून घेऊन ट्रॅफिक कंट्रोल करत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॉन्स्टेबल प्रियंकाचे खूप कौतुक केले आहे.एक स्त्री तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य कसे उत्तमरीतीने सांभाळू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे, असे म्हणत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

स्वरा ‘तनू वेडस् मनू’, ‘रांझना’, ‘चिल्लर पार्टी’, ‘निल बट्टे सन्नाटा’ आणि ‘वीरे दि वेडिंग’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून नावारूपाला आली. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच ‘जहा चार यार’ या चित्रपटात दिसणार आहे. यासाठी ती ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या मेकर्ससोबत दिसणार आहे .

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-मुंबईचा ‘डॅडी’ बनणार आजोबा! मुलीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

-जस्टीन बीबरच्या एक्स गर्लफ्रेंडचं नवीन गाणं रिलीझ, ३ दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.