Sunday, June 23, 2024

वयाच्या ३३व्या वर्षी आई बनणार आहे अविवाहित स्वरा भास्कर, उचलले मोठे पाऊल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही इंडस्ट्रीमधील एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखली जाती. वेगवेगळ्या आणि वाखण्याजोग्या भूमिका साकारून स्वराने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. शिवाय अभिनेत्री आपल्या निर्भीड मतांसाठीही ओळखली जाते. तिला समाजातील अनेक मुद्द्यांवर अगदी बिनधास्तपणे बोलताना पाहिलं गेलं आहे. तर आता स्वराने आई होण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वरा भास्करने आई होण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी तिने प्रक्रियाही सुरू केली आहे. इतर अभिनेत्रींप्रमाणे स्वरा भास्करनेही मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वरा भास्कर तिच्या या निर्णयामुळे चर्चेत जोरदार आली आहे. अभिनेत्रीने संभाव्य दत्तक पालक म्हणून साइन इन केले. सध्या ती मूल दत्तक घेण्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये आहे. (swara bhaskar to become unmarried mother at the age of 33 though child adoption)

स्वरा भास्करने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासोबत तिने सांगितले की, देशात कितीतरी लाख मुले अनाथाश्रमात राहतात. स्वरा भास्करने केवळ दत्तक घेण्याची प्रक्रियाच सुरू केली नाही, तर मूल दत्तक घेतलेल्या अनेक जोडप्यांना ती भेटली देखील आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, “मला नेहमीच एक कुटुंब आणि एक मूल हवं होतं. मला वाटतं की दत्तक घेऊनच मी हे स्वप्न पूर्ण करू शकेन. मी नशीबवान आहे की, आपल्या देशात सिंगल महिलांना मुलं दत्तक घेण्याची परवानगी आहे. या काळात मी अनेक जोडप्यांना भेटली आहे, ज्यांनी मुलं दत्तक घेतली आहेत. यासोबतच मी अशा अनेक मुलांना भेटली आहे, जी आता प्रौढ झाली आहेत. त्यांची प्रक्रिया आणि अनुभव मी जाणून घेतले आहेत.”

बऱ्याच संशोधनानंतर स्वरा भास्करने दत्तक घेण्याच्या निर्णयाबाबत पालकांना सांगितले आहे. तिच्या या निर्णयाला तिच्या पालकांनी पाठिंबा दिला आहे. स्वरा भास्कर म्हणाली, “मी CARA द्वारे दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मला माहित आहे की, प्रतीक्षा थोडी लांब आहे, याला तीन वर्षे देखील लागू शकतात. परंतु मी दत्तक मुलाचे पालक होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही.”

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर स्वरा भास्कर आता ‘शीर कोरमा’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती एका लेस्बियनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमीही आहेत. ‘शीर कोरमा’ चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा