Friday, July 5, 2024

रणवीरला ट्रोल करणाऱ्यांवर भडकल्या महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती; म्हणाल्या, ‘महिला जेव्हा नग्न होतात…’

रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या अलिकडेच केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे वादात सापडला आहे. अभिनेत्याने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. एवढेच नाही, तर या फोटोशूटमुळे रणवीर कायदेशीर अडचणीतही सापडला आहे. अभिनेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण वादात काही लोकांनी रणवीरचे समर्थन केले असून, आता दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाती मालीवालने एक ट्वीट केले आहे, ज्यामध्ये तिने रणवीर सिंगच्या ट्रोलवर सडकून टीका केली आहे. स्वाती मालीवाल यांनी लिहिले की, “समाजात महिलांचे न्यूड फोटो रोज येत राहतात आणि त्यावर कोणीही आक्षेप घेतला नाही. जेव्हा आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणार्‍या अभिनेत्याने त्याची न्यूड फोटो क्लिक करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा मुद्दा प्राइम टाइममध्ये चर्चेचा विषय बनतोय. देशात खरे प्रश्न उरले नाहीत का?” (swati maliwal reaction on ranveer singh bold photoshoot controversy)

विशेष म्हणजे, बोल्ड फोटोशूटमुळे रणवीर सिंगच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर महिलांच्या भावना दुखावल्याबद्दल मुंबईच्या चेंबूर पोलिस ठाण्यात अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एवढेच नाही, तर लोक रणवीर सिंगच्या अटकेची मागणी देखील करत आहेत.

रणवीर सिंगविरुद्ध आयपीसी कलम २९२ (अश्लील पुस्तकांची विक्री इ.), २९३, ५०९ आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. रणवीर सिंगचे असे बोल्ड फोटो पाहिल्यानंतर महिलांच्या मनात लाज निर्माण होईल, असा आरोप अभिनेत्यावर करण्यात आला आहे. याच कारणामुळे त्याने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून रणवीरचे बोल्ड फोटो हटवण्याची मागणीही केली आहे. मात्र, रणवीर सिंगच्या समर्थनार्थ अनेक बॉलिवूड स्टार्स समोर आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा