Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन ‘चंपक चाचा’ने व्हिडिओ शेअर करत दिले हेल्थ अपडेट, जाणून घ्या आता कशी आहे तब्येत?

‘चंपक चाचा’ने व्हिडिओ शेअर करत दिले हेल्थ अपडेट, जाणून घ्या आता कशी आहे तब्येत?

काही दिवसांपूर्वी कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मधील अमित भट्ट म्हणजेच ‘चंपक चाचा‘ जखमी झाल्याची बातमी समोर आली होती. तेव्हापासून चाहते प्रचंड नाराज झाले होते. सोशल मीडियावर युजर्स ‘चंपक चाचा’च्या तब्येतीबद्दल विचारत होते. चाहत्यांची चिंता दूर करण्यासाठी आता खुद्द चंपक चाचा यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ‘चंपक चाचा’ (champak chacha) ची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट (amit bhatt) याने मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांचे खंडन करत इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ताे म्हणाला, “काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘चंपक चाचा’ म्हणजेच अमित भट्ट यांचा भीषण अपघात झाल्याच्या बातम्या दाखवल्या जात हाेत्या. मला सांगायचे आहे की, या बातम्या खोट्या आहेत. तसे काहीही झालेले नाही. मला खूप किरकोळ दुखापत आहे. मी एकदम ठीक आहे. मी तुमच्या समोर आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amit Bhatt (@amitbhatt9507)

अमित भट्ट याने सांगितले की, “तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर एक सीन शूट केला जाणार होता, ज्यामध्ये सोढीच्या कारचा टायर हातातून सुटतो आणि तो त्याच्या मागे धावतो. शूटिंगदरम्यान टायर रिक्षाला आदळला आणि मागे आला परिणामी माझ्या गुडघ्यावर येऊन पडला आणि मला किरकोळ दुखापत झाली. डॉक्टरांनी मला 10 ते 12 दिवस विश्रांती घेण्यास सांगितले आहे.”

अभिनेता गोकुळधाम आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कुटुंबाला खूप मिस करत आहे. अमित भट्ट याला लवकर बरे होऊन शूटिंगला परत जायचे आहे. तसेच, त्याने त्याच्या चाहत्यांना काळजी करू नका असा सल्ला दिला आहे.(taarak mehta ka oolta chashmah fame champak chacha aka amit bhatt shared a video about his health update)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबाे! निर्मात्याने राहुल रॉयवर केला ‘हा’ माेठा आराेप, पाठवली कायदेशीर नाेटीस, वाचा सविस्तर

तबस्सुम यांच्या निधनानंतर बिग बी झाले भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा