Wednesday, March 22, 2023

धक्कादायक! राजू श्रीवास्तव यांच्या भावालाही केले रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरू

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastv) यांच्या कुटुंबावर दुहेरी संकटाची वेळ आली आहे. कुटुंबातील दोन मुले रुग्णालयात दाखल आहेत. आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवणारे कॉमेडियन आणि भाजप नेते राजू श्रीवास्तव बुधवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक बेशुद्ध पडले. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपासात कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. याला कॉमेडियनच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राजू श्रीवास्तव यांचा लहान भाऊही रुग्णालयात दाखल आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी  की,  कॉमेडियन राजू श्रीवास्तवचा धाकटा भाऊ गेल्या चार दिवसांपासून न्यूरो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. राजू श्रीवास्तव दुसऱ्या मजल्यावर तर त्याचा भाऊ तिसऱ्या मजल्यावर दाखल आहे. कुटुंबातील दोन मुलगे रुग्णालयात आजाराशी झुंज देत असताना कुटुंबासाठी दुहेरी संकट असेच आहे. राजू श्रीवास्तव कॉमेडीसोबतच राजकारणातही सक्रिय आहेत. ते भाजपचे नेते आणि उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यात उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने ते प्रमुख भूमिका बजावत आहेत.

कॉमेडियनचे पीआरओ अजित सक्सेना यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले की, आता त्यांची नाडी ठीक आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात अनेक ब्लॉकेज आहेत. त्यांचे चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा –

रक्षाबंधन स्पेशल l ‘एक हजारों मेरी बहना है’, ‘या’ गाण्यांनी वाढवला भाऊ बहिणींच्या नात्यातील गोडवा

‘या’ मराठी चित्रपटात झळकणार बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह; म्हणाली, ‘हा अनुभव एकदम…’

कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचा MMS व्हिडिओ लीक? व्हायरल व्हिडिओने रंगली चर्चा

 

हे देखील वाचा