खरचं की काय? अभिनेत्री उर्वशी रौतेला करणार होती चार मुले असणाऱ्या गायकासोबत लग्न, स्वतः केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या आलिशान लाइफस्टाइल आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशनविश्वात उर्वशीने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताचं उर्वशीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिला लग्नाचे अनेक प्रस्ताव आले आहेत. तिला कधी विचित्र प्रस्ताव आले का असे विचारले असताना, उर्वशीने सांगितले की, “तिला एकदा इजिप्शियन गायक प्रपोज केले होते. तिने सांगितले की, दोघांच्या ही वेगळ्या संस्कृतीमुळे तिला हे नाते नाकारावे लागले तसेच तो गायक आधिच विवाहित होता आणि त्याला एक-दोन नव्हे तर चार मुले होती. पुढे बोलताना उर्वशी म्हणाली की, तिला त्या गायकची तिसरी पत्नी बनण्याची इच्छा नव्हती.”

उर्वशीचे करियर
उर्वशी रौतेला हिने २०१३ मध्ये आलेल्या ‘सिंह साब द ग्रेट’ या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून तिच्या अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमृता राव हे मुख्य भूमिकेमध्ये होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करु शकला नाही. पण चित्रपटांमध्ये फारशी उपस्थिती नसतानाही तो खूप प्रसिध्द झाला. नुकत्याच एका माध्यामांशी बोलताना सांगितले की, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की आत्तापर्यंत तिला लग्नाचे अनेक प्रस्ताव आले आहेत, त्यापैकी एक आंतरराष्ट्रीय गायकाकडून ही आला होता. परंतु तो आधिच विवाहित होता.

तिसरी पत्नी होण्यास दिला नकार
नुकताचं माध्यामांना दिलेल्या मुलाखती दरम्यान उर्वशीने तिला प्रपोज करणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगितले. दुबईमध्ये ती इजिप्शियन गायकाला भेटली होती का असे विचारल्यांवर ती म्हणाली की, “हो , परंतु त्या व्यक्तीला आधिच दोन बायका आणि चार मुले आहेत. मला असा कोणाताही निर्णय घ्यायचा नव्हता, ज्यामुळे मला इतक्या दूर जावे लागेल. एकतर त्यांने इथे येऊन राहवे.”

 

View this post on Instagram

उर्वशीने तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात इजिप्शियन अभिनेता-गायक मोहम्मद रमजानसोबत ‘वर्सासे बेबी’ या म्युझिक व्हिडिओद्वारे केली होती. हा व्हिडिओ गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये रिलीज झाला होता, या गाण्यासाठी उर्वशीचा आउटफिट प्रसिद्ध फॅशन डिझायनर ‘डोनाटेला वर्सासने’ स्टाइल केला होता. ‘व्हर्साचे बेबी’ हा गेल्या वर्षातील सर्वात महागड्या म्युझिक व्हिडिओंपैकी एक होता आणि म २०२१ च्या एका माध्यमांच्या वृत्तानुसार, उर्वशीच्या पोशाखाची किंमत १५ कोटी होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

झोप विसरून रात्री साडेबारा वाजता सोनूसाठी जेवण बनवायचा जॅकी चॅन, अभिनेत्याने सांगितला भन्नाट किस्सा

साठीतही प्रचंड उत्साही! निधनानंतर प्रदिप पटवर्धन यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल

दोनदा लग्न तुटल्याने ट्रोल होणाऱ्या श्वेताने सोडले मौन; म्हणाली, ‘अनेकजण घरी बायको असतानाही बाहेर…’