एकदम सुंदर! खूपच बदललीय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘जुनी सोनू’; घेतेय एमबीएचे शिक्षण


टेलिव्हिजनवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत असते. या मालिकेतील पात्र तर खूप लोकप्रिय आहेत. प्रत्येकाची एक वेगळी खासियत आहे. यातील एक पात्र जुनी सोनू म्हणजेच झील मेहता. तिने ही मालिका सोडून खूप काळ झाला आहे. परंतु अनेकांना ती या मालिकेतून बाहेर गेल्यापासून तिच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. ती सध्या काय करते? कुठे राहते? कशी दिसते? तिची लाईफ स्टाईल कशी असेल? यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील. चला तर आज आपण जाणून घेऊया झील मेहताबद्दल…

‘तारक मेहता का उलटा चष्मा’मधील सोनू म्हणजेच झील मेहता आता खूप मोठी झाली आहे. ती आता शाळेतील गणवेशात नाही तर कॉलेज जायला लागली आहे. झील सध्या एमबीए करत आहे. बीबीएची डिग्री घेऊन आता तिने एमबीएला प्रवेश घेतला आहे.

एवढंच नाही तर ती एका ई-कॉमर्स कंपनीत सोशल मीडिया एक्झिक्युटिव्हचे काम करत आहे. तिने या मालिकेत 4 वर्ष काम केले. परंतु त्यांनतर तिने ही मालिका सोडून दिली. तेव्हा तिच्याकडे कारणही तसेच होते. त्यावेळी झील दहावीला होती. त्यामुळे शूटिंग आणि अभ्यास या सगळ्या गोष्टी तिला सांभाळता येत नव्हत्या. त्यामुळे तिने ही मालिका सोडून दिली होती.

झीलला अभ्यासाची खूप आवड आहे. म्हणून ती आता एमबीए करत आहे. तिला दहावीला असताना 90% गुण मिळाले होते. या सोबतच तिच्यात देखील खूप बदल झाला आहे. ती आता खूपच सुंदर दिसू लागली आहे.

तिला नवीन जागेत फिरायला जायला खूप आवडते. तिने तिच्या इंस्टाग्रामवर देखील अनेक फोटो शेअर केले आहेत. तिला तिच्या कुटुंबासोबत फिरायला आणि त्यांच्या सोबत वेळ घालवायला खूप आवडते.

झील ही तारक मेहता का उलटा चष्मा हा मालिकेत भले ही आज दिसत नाही. पण ती अजूनही सर्वांच्या संपर्कात आहे. या मालिकेतील भव्या गांधींशी तिची खूप चांगली मैत्री आहे. ते अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंडियन आयडल १२’मधील अमित कुमार वादावर अभिजीत भट्टाचार्य यांचा शोला पाठिंबा; म्हणाले, ‘त्यांनी कॅमेऱ्यासमोर…’

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.