‘इंडियन आयडल १२’मधील अमित कुमार वादावर अभिजीत भट्टाचार्य यांचा शोला पाठिंबा; म्हणाले, ‘त्यांनी कॅमेऱ्यासमोर…’


टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला लोकप्रिय आणि प्रसिद्ध सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ हा शो मागच्या बऱ्याच काळापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘इंडियन आयडल १२’ च्या किशोर कुमार विशेष भागात अमित कुमार यांनी स्पर्धकांचे कौतुक करण्यास मला सांगितले गेले होते. असे विधान केल्यापासून हा शो सतत वेगवेगळ्या वादात अडकत आहे. त्यामुळे या शो वर खूप टीका होत आहे.

मात्र, आता या शोच्या समर्थनात प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य आले आहेत. त्यांनी सांगितले की, अमित कुमार आणि ‘इंडियन आयडल’ हा वाद मोठा करून सर्वांसमोर आणला गेला. अभिजीत भट्टाचार्य यांनी सांगितले की, “वादानंतर ते स्वतः अमित कुमार यांच्याशी बोलले आहे. अमित कुमार यांनी कॅमेऱ्यासमोर असे कोणतेच विधान केले नाही. त्यांचा ना कोणता व्हिडिओ आहे नाही ऑडिओ, फक्त वृत्तपत्रातील बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेऊन शो ला ट्रोल केले आहे.”

“इंडियन आयडलच्या चालू पर्वातील सर्व स्पर्धक हे एक से बढकर एक आहेत. ही सर्व मुलं मला नेहमी ९० च्या दशकात घेऊन जातात. प्रत्येक आठवड्यात त्यांना देण्यात येणाऱ्या नवीन थीम नवीन गाणी अतिशय आत्मविश्वासाने ही मुलं सादर करतात. प्रत्येक प्रकारची गाणी गाणे ही काय साधी गोष्ट नाही. मात्र, तरीही ही मुलं नेहमी धमाका करतात. या मुलांना बघताना मला एकसाथ १० अमिताभ बच्चन उभे केले आहेत, असे वाटत असते. असे असताना कशी काय स्पर्धा होईल. स्पर्धा सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खानसोबत होते अमिताभ बच्चन यांच्यासोबत नाही,” असेही ते म्हणाले.

अमित कुमार विवादावर अंजली गायकवाडने सांगितले की, “अमित कुमार यांनी सांगितले की त्यांना आमचे गाणे आवडले नाही. तरीही आम्हाला वाईट नाही वाटले. कारण हे त्यांचे मत होते. त्यांनी आम्हाला ज्या काही सुधारणा सांगितल्या आहे, त्या आम्ही आमच्या गाण्यात करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. मात्र, त्यांचे व्यक्तव्य हे त्यांचे होते, प्रत्येकाला आपले मत देण्याचा अधिकार आहे.”

अमित कुमार वादांनंतर या शोवर सोनू निगम, सुनिधी चौहान यांनी देखील काही आरोप केले आहेत. शिवाय शो मधील स्पर्धक शनमुखप्रियाला शो मधून काढण्याची आणि बाहेर पडलेल्या अंजली गायकवाडला पुन्हा घेण्याची मागणी होत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीचा बिकिनीतील व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ, करतेय ‘या’ गोष्टीला मिस

-आहा कडकच ना! ‘लुट गए’ गाण्यावर पोरीचा जबरदस्त डान्स, मिळाले १ कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज

-नादच खुळा! यूट्यूबर शिरुश्रीने केला धमाकेदार ‘शिव तांडव’ डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय


Leave A Reply

Your email address will not be published.