Tuesday, April 23, 2024

‘सब गजब’ या ट्रेंडिंग गाण्यावर बबिताजीने केला जबदरस्त डान्स; युजर्स म्हणाले, ‘आता जेठालालची झोप उडणार…’

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ फेम बबिता जीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. बबिता जी जेठालालचीच नाही, तर चाहत्यांच्या हृदयाची धडकन आहे. या शोमध्ये बबिता जीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दुसरी कुणी नसून मुनमुन दत्ता हाेय. मुनमुन अशा स्टार्सपैकी एक आहे जी प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असते. मुनमुन अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. मुनमुन दररोज तिच्या नवीनतम फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काय आहे नेमके व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता (munmun dutta) हिने तिचा एक नवीन व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘सब गजब’ या ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या प्रत्येक तालावर मुनमुन ज्या पद्धतीने नाचतेय ते पाहण्यासारखे आहे. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा शॉर्ट वन पीस ड्रेस परिधान केला आहे आणि तिच्या उंच पोनीने हेअर स्टाइल पुर्ण केली आहे. यादरम्यान, अभिनेत्रीचा कमीत कमी मेकअप तिला आणखी सुंदर बनवत आहे.

मुनमुन दत्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. यावर चाहते सतत कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘जेठालाल जींसोबतही व्हिडिओ बनवा.’, तर एकाने लिहिले, ‘बबिता जी नवीन कार कधी घेणार आहेत?’ अशात एकाने लिहिले, ‘तुझा डान्स पाहून जेठालालची झोप उडेल.’ अशा अनेक भन्नाट कमेंट्स मुनमुनच्या या डान्स व्हिडिओवर येत आहेत.(tv actress aka munmun dutta latest dance video viral )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खान लग्नासाठी नाही, तर मुलासाठी करतोय प्लॅनिंग; म्हणाला, ‘कायदा बदलला नाही, तर…’

मलायका अरोराच्या प्रेमात पडलेला अर्जुन बर्लिनच्या रस्त्यावर बनला मजनू, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा