दलित समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने झाली ट्रोल; ‘हे’ कारण देत ‘बबिता जी’ने मागितली माफी

taarak mehta ka ooltah chashmah fame munmun dutta babita ji slammed for casteism remark apologize later


लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता आपल्या अभिनय आणि सुंदरतेसाठी सतत चर्चेत असते. मात्र, ती आता भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ती आता वादात सापडल्याचे दिसून येत आहे. वास्तविक, अभिनेत्रीने आपल्या एका व्हिडिओमध्ये दलित समाजासाठी जातीयवादी शब्द वापरला आहे. तिच्या या विधानानंतर ट्रोलर्सने तिला सोशल मीडियावर चांगलेच घेरले. या व्हिडिओवर बर्‍याच युजर्सने आक्षेप घेतला आहे. मात्र, आपली चूक समजल्यानंतर मुनमुनने लगेचच हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरून हटविला.

आता या व्हिडिओबद्दल दिलगिरी व्यक्त करत, मुनमुन दत्ताने एक निवेदन जारी केले आहे. तिने लिहिले की, “हे त्या व्हिडिओच्या संदर्भात आहे, जो मी काल पोस्ट केला होता. त्यात मी वापरलेल्या एका शब्दाचा चुकीचा अर्थ लावला गेला. कोणाचा अपमान करणे, धमकावणे किंवा भावना दुखावणे हे माझे उद्दिष्ट नव्हते. माझ्या भाषेच्या अपुऱ्या ज्ञानामुळे, मला खर्‍या अर्थाने शब्दाचा अर्थ माहित नव्हता. जेव्हा याचा अर्थ काय आहे हे समजले, तेव्हा मी लगेच तो भाग काढून टाकला.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “मला जाती, धर्म किंवा लिंगानुसार प्रत्येक व्यक्तीचा अत्यंत आदर आहे आणि मी समाज किंवा राष्ट्रासाठी त्यांच्या अपार योगदानाचा स्वीकार करते. मी प्रामाणिकपणे प्रत्येक व्यक्तीची क्षमा मागत आहे आणि मला त्याच्याबद्दल खेद आहे.”

मुनमुन दत्ताने एक दिवसापूर्वी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या मेकअपबद्दल बोलत होती. या व्हिडिओमध्ये ती म्हणाली होती की, “माझ्याकडे लिप टिंट आहे, जो मी माझ्या चेहऱ्यावर ब्लशसारखा लावला आहे, कारण लवकरच मी यूट्यूबवर पदार्पण करणार आहे.” याच व्हिडिओमध्ये तिने जातीवादक शब्द वापरला आहे.

या व्हिडिओनंतर अभिनेत्री बरीच चर्चेत आली. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील बरेच युजर्स तिला ट्रोल करत आहेत. मुनमुन गेल्या १३ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचा एक भाग आहे. जिथे तिला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. तिच्या खऱ्या नावापेक्षा तिला शोमधील बबिता या नावानेच अधिक ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.