बॉलिवूडमधील सिंघम म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगन याने 80 -90 दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकतंच प्रदर्शित झालेला दृष्यम 2 चित्रपटामे बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला असून कोट्यावदीचा गल्ला जमवला आहे. अशातच अभिनेता पुन्हा एकदा नवीन अंदाजामध्ये म्हणजेच भोला चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी भोला चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पसंतीस उतरला आहे.
एवग्रीन जोडी म्हणेजच 80-90 च्या दशकामधील प्रसिद्ध जोडी अजय देवगन (Ajay Devgon) आणि अभिनेत्री तब्बू (Tabu) या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दृष्यम 2 (Drishyam 2) मध्ये देखिल ही एवरग्रीन जोडी पाहायला मिळाली. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नुकतंच अजय देवगनच्या भोल चित्रपटाचा 2 रा टीझर प्रर्शित झाला आहे. ज्याच्या प्रमोशनसाठी तब्बू आणि अजय यांनी एका सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. मात्र, त्यावेळी तब्बूने असे कृत्य केले की, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अजच्या भोला चित्रपटामध्ये तब्बू मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये तब्बूचा डॅशिंग लूक पाहायला मिळणार आहे. भोलाच्या टीझर लॉंच सोहळ्यामध्ये तब्बू आणि अजयने एकत्र एंट्री मारली होती. देघेही खूपच खूश दिसत होते. या टीझर लाँच सोहळ्यामध्ये उपस्थितांशी संवाद साधत होते, तेव्हा तब्बूने अजयला तिच्याजवळ खेचलं आणि गालाला किस केलं. यादरम्यानचे दोघांचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अजय आणि तब्बूमध्ये किती चांगली मैत्री आहे हे पुन्हा एकदा या व्हिडीओच्या माध्यमातून दिसून आलं. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून यांची मैत्री खूप घट्ट आहे. त्याशिवाय अजयने देखिल त्यांच्या मैत्रीविषयी वक्तव्य केलं.
हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सेल्फी’ रिलीज हाेण्यापूर्वीच अक्षय कुमार साईबाबांच्या चरणी, शिर्डीमध्ये जाऊन अभिनेत्याने घेतलं साई समाधीचं दर्शन
‘… म्हणून मी मंगळसुत्र घालतो’, बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकाने स्पष्टच सांगितलं