Wednesday, December 4, 2024
Home साऊथ सिनेमा साऊथ सुपरस्टारचा सुरक्षा रक्षकांवरच आरोप; म्हणाला, ‘भाषेमुळे माझ्या आई-वडिलांना…’

साऊथ सुपरस्टारचा सुरक्षा रक्षकांवरच आरोप; म्हणाला, ‘भाषेमुळे माझ्या आई-वडिलांना…’

टॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सिद्धार्थ याचाही समावेश होतो. तमिळ अभिनेता सिद्धार्थने ‘रंग दे बसंती‘ या सिनेमातून हिंदी प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले होते. सिद्धार्थ नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बेधडक वक्तव्य करताना दिसतो. अशात नुकतेच सिद्धार्थने त्याचे दु:ख व्यक्त केले आहे. यामध्ये त्याने सांगितले आहे की, कशाप्रकारे त्याच्या वयस्कर आई-वडिलांना त्रास दिला गेला आहे.

साऊथ सुपरस्टार सिद्धार्थ (South Actor Siddharth) याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीत त्याने विमानतळ कर्मचाऱ्यांवर आरोप करत त्यांचा एक फोटो शेअर केला. तसेच, त्याच्या आई-वडिलांना झालेल्या त्रासाबद्दल सांगितले. सिद्धार्थ इंस्टाग्राम स्टोरी (Siddharth Instagram Story) शेअर करत कॅप्शनमध्ये म्हणाला की, “सातत्याने 20 मिनिटे मुदराई विमानतळ सीआरपीएफने त्रास दिला. त्यांना इंग्रजीत बोलण्यास सांगूनही ते सातत्याने माझ्या आई-वडिलांना म्हणत होते की, तुमच्या बॅगांमधील सिक्के काढा आणि सातत्याने हिंदीत बोलण्यास सांगत होते.”

Siddharth-Insta-Story
Photo Courtesy Instagramworldofsiddharth

पुढे बोलताना सिद्धार्थ म्हणाला की, “हे खूपच उद्धट होते. जेव्हा आम्ही या विरोधात आवाज उठवला, तर ते आम्हाला म्हणाले की, हे भारत आहे आणि इथे असेच होते. जॉबलेस लोक ताकद दाखवत आहेत.” अभिनेता सिद्धार्थने या पोस्टमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला टॅग करण्याऐवजी सीआरपीएफ यांना टॅग केले.

खरं तर, सिद्धार्थ हिंदीपेक्षा साऊथ इंडस्ट्रीत जास्त सक्रिय असतो. त्याने तमिळ आणि तेलुगू भाषेतील अनेक सिनेमात काम केले आहे. सिद्धार्थने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात 2002मध्ये ‘कन्नाथिल मुथामित्तल’ या तमिळ सिनेमातून केली होती. याव्यतिरिक्त त्याने ‘बॉयज’ (2003) या सिनेमात काम केले होते. सन 2006मध्ये रिलीज झालेल्या ‘रंग दे बसंती’ या सिनेमात त्याने कुणाल कपूर, आमिर खान आणि शरमन जोशी यांच्यासोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला वाहवा मिळाली होती. त्याने हिंदीतील ‘रंग दे बसंती’शिवाय ‘स्ट्रायकर’ आणि ‘चश्मेबद्दूर’ यांसारख्या सिनेमातही केले. तो शेवटचा 2023मध्ये रिलीज झालेल्या ‘इंडियन 2’ या सिनेमात झळकणार आहे. (tamil actor siddharth gets furious at airport staff read here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
खळबळजनक! आणखी एका तरुण अभिनेत्रीची आत्म’हत्या, चाहते अन् कुटुंबाला बसलाय धक्का
जगभरात 8 हजार कोटी कमावणाऱ्या ‘अवतार 2’ने बॉलिवूडलाही नाही सोडलं, कमावला तब्बल ‘इतका’ पैसा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा