Friday, April 19, 2024

‘रंग दे बसंती’ची १६ वर्षे: ४० वर्षांच्या आमिर खानने २५ वर्षीय तरुण दिसण्यासाठी केले होते ‘हे’ काम

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि सोहा अली खान (Soha Ali Khan) यांच्या अभिनयाने सजलेला चित्रपट ‘रंग दे बसंती’ हा देशावर बनला होता. हा चित्रपट २६ जानेवारी २००६ रोजी प्रदर्शित झाला होता. देशभक्तीने भरलेला हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला, तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या चित्रपटाने अनेक विक्रम रचले होते आणि निर्मितीदरम्यान अनेक कथाही होत्या. प्रसून जोशी यांनी डायलॉग लिहिले आणि एआर रहमान (AR Rahman) यांनी ३ वर्षांच्या मेहनतीनंतर चित्रपटाचे संगीत दिले. मुख्य अभिनेता आमिरने नेहमीप्रमाणे या चित्रपटात स्वत:ला झोकून दिले. चला तर मग या चित्रपटाच्या १६ व्या वर्षी चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान घडलेले किस्से जाणून घेऊया.

कास्टिंगबद्दल नाराज होते राकेश ओमप्रकाश मेहरा
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’ चित्रपटात आमिर खान, सोहा अली खान व्यतिरिक्त माधवन, अतुल कुलकर्णी, शर्मन जोशी, कुणाल कपूर, ब्रिटीश अभिनेत्री ॲलिस पॅटन सुद्धा होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश यांनी त्यांच्या ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रात चित्रपटाच्या निर्मितीबाबत अनेक मनोरंजक खुलासे केले आहेत. जेव्हा राकेश यांनी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांना चित्रपटात करण सिंघानिया या पात्राला कास्ट करण्यात मोठी अडचण आली.

ऋतिक रोशनची समजूत घालण्यासाठी आमिर खानला पाठवण्यात आले होते घरी
राकेश यांना त्यांच्या चित्रपटात या खास भूमिकेसाठी ऋतिक रोशनला कास्ट करायचे होते. राकेश यांनी सांगितले की, “जेव्हा ऋतिक रोशन तयार नव्हता, तेव्हा मी आमिर खानला ऋतिकशी एकदा बोलण्याची विनंती केली. आमिर खान ऋतिकच्या घरी गेला आणि त्याला सांगितले की, हा चांगला चित्रपट आहे, पण ऋतिकला ते मान्य नव्हते.” ही भूमिका अभिषेक बच्चनलाही ऑफर करण्यात आली होती. मात्र बॉलिवूडच्या या बड्या कलाकारांनी नकार दिला. परिस्थिती अशी झाली होती की, चित्रपटाच्या शूटिंगच्या महिनाभर आधी तमिळ अभिनेता सिद्धार्थला फायनल करण्यात आले. ‘रंग दे बसंती’पूर्वी सिद्धार्थने कोणताही हिंदी चित्रपट केला नव्हता.

तारीख नसल्याने शाहरुख खानने दिला नकार
राकेश यांच्यासोबत हे एकदाच घडले नाही. चित्रपटातील एक पात्र, फ्लाइट लेफ्टनंट अजयला राठोडच्या भूमिकेसाठी शाहरुख खानला कास्ट करायचे होते. शाहरुखला चित्रपटाची कथा सांगण्यासाठी राकेश अमेरिकेला गेले होते. कारण त्यावेळी शाहरुख तिथे ‘स्वदेश’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. तारीख नसल्यामुळे शाहरुखने चित्रपट करण्यास असमर्थता व्यक्त केली होती. ही भूमिका नंतर साऊथचा सुपरस्टार आर माधवनने साकारली होती.

आमिर खानने एका पंजाबी शिक्षकाला ठेवले कामावर
या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खानने नेहमीप्रमाणे मेहनत घेतली होती. माध्यमांतील वृत्तानुसार, मिस्टर परफेक्शनिस्टने पंजाबी शिकण्यासाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली आणि त्याच्याकडून बोलण्याची कला शिकला. ४० वर्षीय आमिर खानने २५ वर्षीय तरुणाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेतली होती. आमिरही त्याच्या वयापेक्षा खूपच लहान दिसतो. १६ वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या यशाने बॉलिवूडचा पॅटर्न बदलला. ‘रंग दे बसंती’ हे तरुणांसाठी देशभक्तीचे आधुनिक प्रतीक बनले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा