Sunday, April 14, 2024

खळबळजनक! आणखी एका तरुण अभिनेत्रीची आत्म’हत्या, चाहते अन् कुटुंबाला बसलाय धक्का

वर्ष संपत असताना अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. नुकतेच टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन आत्म’हत्या केली होती. तिच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही इंडस्ट्रीतील लोक सावरले नाहीयेत, तोच आता आणखी एक दु:खद बातमी समोर येत आहे. छत्तीसगडची 22 वर्षीय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर लीना नागवंशी हिनेदेखील 26 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. लीनाच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. तिचे कुटुंबीय खूपच घाबरले असून धक्क्यात आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

का केली आत्म’हत्या?
लीना नागवंशी (Leena Nagwanshi) हिने आत्म’हत्या का केली, याची माहिती समोर आली नाहीये. मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोटही मिळाली नाहीये. घटनास्थळावरून लीनाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी कुटुंबीयांनी लीनाचा मृतदेह फासावरून खाली उतरवला होता. लीनाच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे की, तिचे कोणाशीही वादविवाद नव्हते. ती बी. कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

लीना होती सोशल मीडिया स्टार
लीना ही छत्तीसगडच्या रायगडमधील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार होती. ती इंस्टाग्रामसोबतच युट्यूबवरही खूपच सक्रिय असायची. इंस्टाग्रामवर तिचे 10 हजारांहून अधिक फॉलोव्हर्स होते. तिचा प्रत्येक व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल व्हायचा. चाहत्यांनाही तिचा अंदाज फारच आवडायचा. तिचा एक प्रसिद्ध युट्यूब चॅनेलही होता.

https://www.youtube.com/@ROYALLEENA

अभिनेत्री तुनिषा शर्मानेही केली होती आत्म’हत्या
टीव्ही अभिनेतरी तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिनेदेखील आत्म’हत्या केली होती. ती 20 वर्षांची होती. तिने 24 डिसेंबर जगाचा निरोप घेतला होता. तिच्यावर मंगळवारी (दि. 27 डिसेंबर) सायंकाळी मुंबईच्या मीरा रोड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. यादरम्यान तुनिषाच्या आईची तब्येत खूपच खालावली होती. तुनिषाचा मृतदेह ‘अलीबाबा- दास्तान ए काबुल’ या टीव्ही शोच्या सेटवर सापडला होता. तुनिषा आणि शीजान यांचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी शीजानला अटक केल्याचे वृत्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जगभरात 8 हजार कोटी कमावणाऱ्या ‘अवतार 2’ने बॉलिवूडलाही नाही सोडलं, कमावला तब्बल ‘इतका’ पैसा
‘त्या दिवशी माझ्या करिअरचा द एंड होईल…’, सलमानने 1990मध्ये लिहिलेलं खुलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा