Wednesday, December 6, 2023

राजूंना बरं-वाईट म्हणणाऱ्या कॉमेडियनचा नेटकऱ्यांनी केला बाजार, ट्रोलर्सला घाबरत मागितली माफी

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी बुधवारी (दि. 21 सप्टेंबर) जगाचा निरोप घेतला. त्यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 41 दिवस मृत्यूशी झुंज देताना या लढाईत ते अपयशी ठरले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीत एकच खळबळ माजली होती. त्यांना सर्व क्षेत्रातील लोक श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मात्र, त्यांच्यावर टीका करताना एका स्टँडअप कॉमेडियनची जीभ घसरली. वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल झालेल्या कॉमेडियनने आता माफी मागितली आहे.

स्टँडअप कॉमेडियन ट्रोल
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना श्रद्धांजली देण्याच्या नादात एक कॉमेडियन सोशल मीडियावर जोरदार ट्रोल झाला. हा कॉमेडियन इतर कुणी नसून प्रसिद्ध कॉमेडियन रोहन जोशी (Rohan Joshi) आहे. त्याने राजूंच्या निधनानंतर वादग्रस्त कमेंट केली होती. त्याने लिहिले होते की, “राजू श्रीवास्तवने लोकांची खूप अपमान केला आहे. राजूला कॉमेडी येत नाही. त्याने प्रत्येकवेळा स्टँडअप कॉमेडीची थट्टा उडवली आहे. शेवटी राजूपासून आम्ही सुटलो.” रोहनने त्याची कमेंट डिलीट केली आहे. मात्र, चाहते त्याच्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून व्हायरल करत आहेत. तसेच, त्याच्यावर टीका करत आहेत.

जोरदार ट्रोल झाला रोहन जोशी
रोहन जोशी याची कमेंट व्हायरल होताच, सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. लोकांनी रोहनला जोरदार ट्रोल केले. रोहनच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोक त्याची खरडपट्टी काढत आहेत. सोशल मीडियावर आपला बाजार होतोय, हे लक्षात आल्यानंतर रोहन पुरता घाबरला आहे. त्यामुळे आता त्याने त्याची पोस्ट डिलीट केली आहे. तसेच, त्याने सर्वांची माफी मागितली आहे.

रोहन जोशीने मागितली माफी
रोहन जोशीने सोशल मीडियावर लिहिले की, “मला माझी चूक समजल्यामुळे, मी माझी कमेंट डिलीट केली आहे. माझ्या वैयक्तिक भावना व्यक्त करण्याची ही वेळ नाहीये. माझ्या वक्तव्यामुळे कुणाचे मन दुखावले असेल, तर मी माफी मागतो.”

Rohan-Joshi

कॉमेडियन रोहनने माफी मागूनही नेटकऱ्यांचा राग शांत होत नाहीये. ते म्हणत आहेत की, रोहनच्या मनात खूपच वाईट गोष्टी भरल्या आहेत. आता हे प्रकरण शांत होते की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सोशल मीडियावर व्हायरल होतोय राजूंचा शेवटचा व्हिडिओ, कुटुंबासोबत गाणे गाताना दिसले कॉमेडियन
वडिलांसमान राजूंच्या अंत्यसंस्काराला भाऊच होता गैरहजर, कारण जाणून तुम्हीही व्हाल भावूक
बॉलिवूडने दमदार अभिनेत्री गमावली! डायरेक्टरच्या घाणेरड्या मागणीमुळे ‘या’ ऍक्ट्रेसने घेतला मोठा निर्णय

हे देखील वाचा