×

दिशा परमार-राहुल वैद्यच्या घरात होणार चिमुकल्या पावलांचं आगमन? अभिनेत्रीने स्वत: सांगितले सत्य

टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक अभिनेत्री यंदा आई होणार असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून समोर येत आहेत. आता या यादीत अभिनेत्री दिशा परमारचे (Disha Parmar) नाव सुद्धा सामील करण्यात आले आहे. मात्र या बातम्यांना दिशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पूर्णविराम दिला आहे.

अभिनेत्री दिशा परमार आपल्या दमदार अभिनयासाठी टीव्ही मालिका क्षेत्रात प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने तिने सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अलीकडेच पती राहुल वैद्यसोबत (Rahul Vaidya) दिशा मुंबईमधील एका हॉटेलबाहेर जेवण करून येताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. यावेळी दिशाची तब्ब्येत बघून तिच्या चाहत्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला होता. तिच्या आउटफीटमुळे चाहत्यांनी ती लवकरच आई होणार असल्याची चर्चा सुरू केली होती. या फोटोवर चाहत्यांनी अशा प्रतिक्रिया सुद्धा दिल्या होत्या. यावर दिशाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या पोस्टमध्ये दिशा म्हणते की, “यापुढे कधीही ओवरसाइज शर्ट घालून बाहेर पडणार नाही. ही पोस्ट त्यांच्यासाठी आहे जे माझ्याकडून मी प्रेग्नंट असल्याची बातमी ऐकायला उत्सुक आहेत. मी त्यांना सांगते की मी प्रेग्नंट नाही.” या पोस्ट सोबत दिशाने हसण्याचा आणि रडण्याचा इमोजी शेअर केला आहे.

अभिनेत्री दिशा परमार आणि राहुल वैद्य टीव्ही क्षेत्रातील यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जातात. दोघांनी २०२० मध्ये जुलै महिन्यात लग्न केले होते. तेव्हापासुन त्यांचे चाहते ही गुड न्यूज ऐकायला आतुर झाले आहेत. सध्या दिशा तिच्या ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेतील तिची भूमिका सर्वांना आवडत आहे. तर राहुल सध्या त्याची गाणी तयार करण्यात व्यस्त आहे.

हेही वाचा

Latest Post