×

Roadies | रणविजय अन् नेहानंतर आता रफ्तारनेही ठोकला ‘रोडिज’ला राम राम! कारण देत म्हणाला…

सध्या टीव्हीवर रोज नवनवीन रियालिटी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे कार्यक्रम प्रेक्षकांना आकर्षित करण्यात चांगलेच यशस्वी होत आहेत, त्यामुळे या कार्यक्रमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये एमटीवीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘रोडिज’ सध्या सगळीकडे चर्चेत आहे. लोकप्रिय होत असतानाच या कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘रोडिज’ हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमाचे अनेक यशस्वी पर्व पूर्ण झाले आहेत. मात्र आता या कार्यक्रमाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण १८ वर्ष कार्यक्रमाचा भाग असलेला प्रसिद्ध अभिनेता रणविजय सिंगने (Ranvijay Singh) या कार्यक्रमाला रामराम ठोकला. आता रणविजयच्या जागी या कार्यक्रमात सोनू सूद (Sonu Sood) काम करताना दिसणार आहे. त्यानंतर फक्त रणविजय नव्हे, तर अभिनेत्री नेहा धूपियाने (Neha Dhupia) सुद्धा हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. आता या कार्यक्रमाच्या चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कारण रॅपर रफ्तार (Raftar) सुद्धा हा शो सोडत असल्याचे निश्चित झाले आहे.

रोडिजच्या चाहत्यांना रफ्तारच्या शो सोडण्याच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. आता या कार्यक्रमात अभिनेता सोनू सूद काम करताना दिसणार आहे. याबद्दल बोलताना रफ्तार म्हणाला की, “यापुढे मी या कार्यक्रमाचा भाग नसेन. याबद्दल मी आधीच सांगितले होते. कार्यक्रमाचे स्वरुप बदलत आहे मात्र तरीही मी कार्यक्रमात दिसणार नाही. कारण मी दुसर्‍या कामात व्यस्त आहे.”

समोर आलेल्या बातमीनुसार, रफ्तार अभिनेते नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम सोडल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post