Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत करणार तेजश्री प्रधान एन्ट्री, होणार नवा ट्रक सुरू

स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका सध्या ट्रेडिंग आहेत. प्रत्येक मालिकेचे कथानक उत्कृष्ट आहे. पण या सगळ्या मालिकांमध्ये एक मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे, ती मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा‘ (Fulala Sugandh Maticha) होय. या मालिकेची कहाणी, शीर्षकगीत, पात्र, डायलॉग सगळ्यांनी आतापर्यंत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. डोळ्यात पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली एक सर्वसामान्य घरातील मुलगी. पण संसाराचा‌ गाडा ओढताना ती तिच्या स्वप्नाचा त्याग करते. परंतु या सगळ्यात तिचा जोडीदार म्हणजे तिचा पती कसा नव्याने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभारी देतो. ही कहाणी या मालिकेतून दाखवली आहे. 

या मालिकेने अनेक वळणं घेतली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला आतापर्यंत खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. मालिकेतील सगळीच पात्र खूप चांगली आहे. अशातच हाती माहिती आली आहे की, या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान एन्ट्री करणार आहे. ही बातमी ऐकून सगळेच खूप खुश झाले आहेत. (Tejashri pradhan enter in fulala sugandh maticha serial soon)

मालिकेत एक स्पर्धा दाखवली जाणार आहे. ज्यात कीर्ती आणि एमली भाग घेणार आहे. कदाचित या ट्रकमध्ये तेजश्रीची एन्ट्री दाखवतील असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. परंतु मालिकेत तिची नक्की काय भूमिका असणार आहे. याची माहिती अजूनही समोर आली नाही. तेजश्रीची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ‘लेक लाडकी या घरची’, ‘होणार सून मी या घराची’, ‘अगंबाई सासूबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिका तिने गाजवल्या आहेत. त्यामुळे तिच्या येण्याने ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत नक्कीच कायतरी मोठा आणि सकारात्मक बदल घडेल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत समृद्धी केळकर आणि हर्षद अटकरी मुख्य भूमिकेत आहे. हर्षदने या आधी ‘दुर्वा’, ‘अंजली’, ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. तर समृध्दीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत काम केले आहे. त्यांची ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका हिंदीमधील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे. हिंदीमध्ये देखील ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

हेही वाचा :

मकोका न्यायालयासमोर सोनू सूदने दिली कबुली; म्हणाला, ‘पुजारीने मला धमकीचा फोन केला होता.’

‘अनुराधा’ वेबसीरिजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी तेजस्विनी पंडितने केला असा लूक, पाहून हरपेल तुमचेही भान

‘संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात’, म्हणत क्रांती रेडकरने दिल्या पती समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

 

 

हे देखील वाचा