Friday, April 19, 2024

मकोका न्यायालयासमोर सोनू सूदने दिली कबुली; म्हणाला, ‘पुजारीने मला धमकीचा फोन केला होता.’

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या चांगलाच चर्चेत आहे. मंगळवारी (१४ डिसेंबर) रोजी २०१४ मध्ये मोरानी बंगल्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मकोका न्यायालयात हजर होता. यावेळी त्याने गॅंगस्टार रवी पुजारीने त्याला फोन करून धमकी दिली होती हे सांगितले. त्याने ‘हॅप्पी न्यू ईयर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये भाग घेऊ नये.

अभियोजन पक्षाने डाव केला आहे की, हिंदी चित्रपटांचा विदेशी प्रचार अधिकाऱ्यांपासून मोरानीपर्यंत बनवण्याची चाल सुरू आहे. सोनू सूद व्यतिरिक्त २०१४ मधील या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांसारखे बॉलिवूड कलाकार होते. (Sonu Sood ne recorded his statement on front of macoca court said I had received threat call from Ravi pujari)

विशेष लोक अभियोजक प्रदीप घरात यांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्याने अभियोजन प्रकरणाचे पूर्ण समर्थन केले आणि याबाबत सुनावणी करत महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण मकोका न्यायालयासमोर मंगळवारी त्यांची रेकॉर्डिंग पूर्ण केली गेली.

यावेळी सोनू सूदने न्यायालयाला सांगितले की, २०१४ मध्ये पुजारीने त्याला कॉल केला होता की, ‘हॅपी न्यू ईयर’ च्या प्रमोशनमध्ये सामील होऊ नको. त्याने सांगितले की, त्याला माध्यमातील वृतातून समजले होते की, मुंबईमधील मोरानी घरात गोळीबार झाला आहे.

अभियोजन पक्षाच्या मते, पुजारी ‘हॅप्पी न्यू इयर’चे कलाकार आणि चालक दलाला निशाण्यावर घेत होता. जेव्हापासून मोरानीने गँगस्टारला चित्रपटाचा विदेशी प्रचार अधिकार देण्याची मागणी फेटाळली होती. सोनू सूदला असा धमकीचा फोन आल्यानंतर त्याने पोलिसांना सांगून त्याला सुरक्षिततेची मागणी केली होती. त्यावेळी पुजारीने बाकी कलाकार आणि क्रू मेंबरला देखील धमकी दिली होती.

यानंतर आता सोनू सूद चर्चेत आला आहे. सोनू सूद हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. कोरोना काळात त्याने अनेकांना मदत केली आहे. त्यामुळे तो लोकांच्या मनात देवदूत झाला आहे.

हेही वाचा :

वाढदिवसाच्या अगोदर जॉन अब्राहमच्या सर्व सोशल मीडिया पोस्ट डिलीट, चाहते पडले गोंधळात

यालाच म्हणतात भाईची क्रेझ, लग्न झालेले असूनही ‘या’ अभिनेत्रीने सलमानला घातली लग्नाची मागणी

राणा डग्गुबत्तीने ४० अंडी खात, दिवसभर जिममध्ये घाम गाळत साकारली होती भल्लालदेवची भूमिका

 

 

हे देखील वाचा