‘अनुराधा’ वेबसीरिजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी तेजस्विनी पंडितने केला असा लूक, पाहून हरपेल तुमचेही भान

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. यावर तिने प्लेन लाल रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच कानात डायमंड ईअरिंग घातले आहेत आणि केसांची पोनीटेल घातली आहे. तिच्या एका फोटोमध्ये तिच्या पाठीवरील ‘हॅंड ऑफ फातिमा’चा टॅटू दिसत आहे. तसेच ती या फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Tejaswini pandit share her red saree look photos on social media)

या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर अभिनेत्री धनश्री काडगावकरने कमेंट केली आहे की, “ब्युटीफूल” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा लूक तिने ‘अनुराधा’ वेबसीरिजच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी केला आहे. तिची ‘अनुराधा’ नावाची वेबसीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. संजय जाधव याने ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकाची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हे होते.

हेही वाचा :

बाप रे! ‘लागीर झालं जी’ मालिकेतील आज्या झाला ‘मजनू’, एकदा कारण तर वाचा

‘संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात’, म्हणत क्रांती रेडकरने दिल्या पती समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

‘एक वर्ष रेसलिंग करा आणि मग इकडे या’, टास्कवरून चिडलेल्या मीराने दिले विकासला उत्तर