‘संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात’, म्हणत क्रांती रेडकरने दिल्या पती समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा


मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि उत्कृष्ट डान्सर क्रांती रेडकर (Kranti Redkar) तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून चांगलीच चर्चेत असते. अशातच मंगळवारी (१४ डिसेंबर रोजी) तिच्या पतीचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने त्या दोघांचा एक फोटो पोस्ट करून खास कॅप्शन दिले आहे. क्रांतीचे पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे एनसीबी अधिकारी आहेत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात समीर वानखेने यांनीच त्याला अटक केले होते. त्यानंतर ते चर्चेचा विषय बनले होते. त्यांच्यावर खंडणी घेतल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर क्रांतीने देखील तिचे मत सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले होते.

अशातच क्रांतीने समीर वानखेने यांच्या वाढदिवशी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने त्या दोघांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “समीर वानखेडेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी नेहमी तुमच्याबद्दल आणि तुमच्या शौर्याविषयी खूप काही लिहिते, परंतु आज शब्द कमी पडत आहेत. देशातील अंमली पदार्थांशी निगडीत दुष्टांशी लढा देणं ही एक गोष्ट तर आहे, परंतु तुमच्या या मोहिमेत तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणं हा एक मोठा संघर्ष आहे. या संघर्षाचा तुम्ही दररोज सामना करत आहात आणि त्यावर दररोज तुम्ही मात करत आहात. तुम्ही खूप चांगलं काम करत आहात, समाजातील घाण काढू टाकत आहात. त्यासोबत तरुणांना योग्य मार्ग दाखवत आहात, त्यांच्या भल्यासाठी काम करत आहात (आता कदाचित त्यांना ही बाब समजणार नाही)” (Kranti Redkar give best wishesh to sameer wankhede on his birthday)

पुढे तिने लिहिले की, “तुमच्यासोबत जनता आहे. सामान्य माणूस हुशार आहे. त्याला माहित आहे की, कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे, तसेच त्याला हे देखील माहित आहे की, कोण खरे आहे आणि कोण खोटे आहे. जे लोक आपल्या देशावर प्रेम करतात आणि ज्यांना खरंच काळजी आहे, ते तुमच्यावर प्रेम करत आहेत. पुन्हा एकदा वाढदिसवाच्या हार्दिक शुभेच्छा.” तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. खास गोष्ट म्हणजे क्रांती ने या पोस्टवरील कमेंट्सचा ऑप्शन बंद केला आहे.

क्रांतीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने २००० मध्ये ‘सून असावी अशी’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र तिला खरी ओळख ‘जत्रा’ या चित्रपटातून मिळाली. यातील तिचे ‘कोंबडी पळाली’ हे गाणे प्रचंड गाजले. पुढे अभिनेत्रीने ‘फुल ३ धमाल’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘फक्त लढ म्हण’, ‘नो एन्ट्री: पुढे धोका आहे’, ‘खो खो’ असा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

‘एक वर्ष रेसलिंग करा आणि मग इकडे या’, टास्कवरून चिडलेल्या मीराने दिले विकासला उत्तर

‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील आणखी एका अभिनेत्रीने घेतला मालिकेचा निरोप, कारण अजूनही गुलदस्त्यात

‘हमारा आदमी का ढाप्या नहीं है’, म्हणत हेमांगी कवीने केला तिचा रावडी लूक शेअर

 

 


Latest Post

error: Content is protected !!