‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जूनला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात प्रभासने रामाची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री क्रिती सेनाॅन हिने सितेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर काही लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाला सर्व स्थरातून कडाडून विरोध केला जात आहे.
नुकतेचा आता ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने या चित्रपटावर बंदी घालायची विनंती करणारं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. या पत्राद्वारे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाचं प्रदर्शन तातत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. इतकच नाही तर त्यावर बंदी घालण्याची देखील मागणी केली आहे.
तसेच दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यातची मागणी केली आहे. सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर अन् CBFC चे अध्यक्ष प्रसून जोशी यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळेच हे पत्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चांगलाच वादाच्या भोहऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या संवादांपासून ते व्हिज्युअलपर्यंत सोशल मीडियावर जोकदार टिकेची झोड उडताना पाहायला मिळत आहे. इतकंच नाही, तर चित्रपटातील पात्रांच्या पेहराव आणि स्टाईलवरूनही दिग्दर्शक आणि कलाकारांंना खूप ट्रोल केलं जात आहे. अशात एकापाठोपाठ एक हा चित्रपट नव्या वादात सापडत आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र चांगलच गाजले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापुर्वी प्रेक्षकांनी ऍडव्हास बुकिंग केले होते. पण सोमवारी ‘आदिपुरुष’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनलाही मोठा फटका बसला आहे. कारण तिकीट विक्री 75 टक्क्यांनी घसरली आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (All India Cine Workers Association demands ban on ‘Adipurush’)
अधिक वाचा-
–‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, युजर म्हणाले, “तुझीही वेळ येईल आणि…”
–श्रद्धा कपूर ऑटोरिक्षाने पोहोचली जिममध्ये; युजर्स म्हणाले, ‘डाउन टू अर्थ म्हणजे श्रद्धा’