‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, प्रवीण तरडे यांच्या लूकने वेधले प्रेक्षकांचे लक्ष


संपूर्ण जगात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले होते. आता कुठे जाऊन कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटवून महाराष्ट्र सरकारने निर्बंध कमी केले आहेत. अशातच सगळे चित्रपटगृहे ५०% क्षमतेने खुली केली आहेत. त्यामुळे आता अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठीमध्ये ‘झिम्मा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने भरघोष कमाई केली. अशातच मराठीतील आणखी एका मोठ्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि अभिनित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊन असतानाच या चित्रपटाची घोषणा झाली होती अशातच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. 

मुळशी पॅटर्न‘ या सुपरहिट चित्रपटानंतर प्रवीण तरडे आता कोणता मोठा प्रोजेक्ट घेऊन येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अशातच त्यांनी एक मोठा चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर सगळ्यांना आता चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. प्रवीण तरडे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांचा लूक पाहून अक्षरशः शहारे उभे राहिले आहेत. प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (sirsenapati hambirrao marathi movie teaser out, pravin tarade in sir senapati character)

हा टिझर प्रवीण तरडे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा टिझर शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट.”

संदीप मोहिते पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येणार आहे. टिझर पाहून प्रेक्षकांची उत्कंटा वाढली आहे. सगळेजण आता आहे चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे. याची वाट पाहत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अजून समोर आली नाही.

हेही वाचा :

‘बघा.. पण प्रेमाने,’ तेजस्विनी पंडितच्या ग्लॅमने चाहते घायाळ, करतायेत कमेंट्सचा वर्षाव

लहान भावाला रक्तबंबाळ झालेला पाहून पळून गेला होता सलमान खान, वाचा संपूर्ण प्रकरण

काजल अग्रवालच्या घरी येणार चिमुकला पाहुणा? अभिनेत्रीचे ‘बेबी बंप’ पाहून प्रेग्नेंसीच्या चर्चेला उधाण! 

 

 

 


Latest Post

error: Content is protected !!