Friday, April 18, 2025
Home अन्य उर्फी जावेदच्या ‘त्या’ वक्तव्यावर नेटकरी संतापले; म्हणाले, ‘देशाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार तुला नाही’

उर्फी जावेदच्या ‘त्या’ वक्तव्यावर नेटकरी संतापले; म्हणाले, ‘देशाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार तुला नाही’

अभिनेत्री उर्फी जावेद हिला सोशल मीडियावर तिच्या फॅशनमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. उर्फी कधी कोणते कपडे परिधान करेल याचा काही नियम नाही. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे कौतुक करतात. तर कधी तिला प्रचंड ट्रोल देखील करतात. सोशल मीडियावर उर्फी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते. उर्फी सोशल मीडियावर तिचे मत मांडताना मागचा पुढचा विचार करत नाही.

नुकतेच उर्फीने (uorfi javed) तिच्या अधिकृत अकांउटवरून एक ट्विट केले आहे. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेचा विषय ठरत आहे. उर्फीच्या मनात जे काही घडते ते ती थेट बोलते. अलीकडेच उर्फीने पंचकृती या चित्रपटाबद्दल ट्विट केले होते, ज्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. #UrfiAgainstRuralBharat ट्विटरवर चांगलाच ट्रेंड होत आहे. तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

4 ऑगस्ट रोजी पंचकृती: फाइव्ह एलिमेंट्स हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याचाच ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजॉय भार्गव यांनी केले आहे. चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी ग्रामीण भारतावर आहे. उर्फीने याबाबत ट्विट केले असून, त्यानंतर तिला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

उर्फीने ट्विट करताना लिहिले की, “देशाची ओळख शहरी भारतातून होत आहे, ग्रामीण भारतातून नाही. ग्रामीण भारतावर चित्रपट बनवून प्रेक्षकांना टीव्ही, स्मार्टफोन, सायकल, स्मार्टवॉच देऊन काय उपयोग? पंचकृती कोणी पाहणार नाही. मी ते लेखी देते.” त्यावरून तिला खूप ट्रोल केले जात आहे. तिच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंट केले आहेत.

 कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “ग्रामीण भाग हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा मोठा भाग आहे.”दुसऱ्याने लिहिले की, “उर्फीला ज्या गोष्टींची माहिती नाही. त्याबद्धल ती असे कसे बोलू शकते.” तर आणखी एकाने लिहिले की, “उर्फीला आपल्या संस्कृतीबद्दल आणि देशाबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही.” तिच्या या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (television actress uorfi javed troll twitter hashtag urfi against rural bharat panch kriti)

अधिक वाचा- 
– ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहून नेटकरी संतापले; म्हणाले, ‘ताई, साडीतच…’
ऋतुजा बागवेच्या आईने लेकीच्या लग्नाबद्दल केले भाष्य; म्हणाल्या, ‘…तू लग्न नाही केलं तरी चालेल’

हे देखील वाचा