Monday, October 2, 2023

ऋतुजा बागवेच्या आईने लेकीच्या लग्नाबद्दल केले भाष्य; म्हणाल्या, ‘…तू लग्न नाही केलं तरी चालेल’

मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात सोज्वळ अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवे हिच्या नाव घेतले जाते. ऋतुजाने अनेक मालिकांमध्ये अभिनय करून खूप प्रसिद्धी मिवली आहे. तिने ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तिच्या या भूमिकेला खूप पसंती मिळली. ऋतुजा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोवर चाहते लाइक आणि कमेंटचा वर्षीव करत असतात. 

सध्या ऋतुजा एका वेगळ्याचा कारणासाठी चर्चेत आली आहे. ऋतुजाच्या आईने तिच्या लग्नाविषयी त्यांचे मत मांडले आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. लग्नाबद्दल बोलताना ऋतुजाची आई म्हणाली की, “ऋतुजा लग्नाच्या वयात येताच मी तिला सांगितलं होतं की, लाॅ ऑफ अट्रॅक्शननुसार तू मुलाची निवड कर. ज्या व्यक्तीशी तुला प्रीत होईल त्याच्याशी तू लग्न करण्याचा निर्णय घे. त्याच कारण म्हणजे ते अखंड असतं. प्रीत असली व्यक्ती नेहमी आपल्या हृदया जवळ राहते. त्यामुळे जोपर्यंत तुला प्रीत होणार नाही तोपर्यंत तू लग्न नाही केलं तरी चालेल.”

तसेच तिची आई पुढे बोलताना म्हणाली की, “ऋतुजाच्या आयुष्यात एखादा असा मुलगा यावा जो देवाने खरोखरच तिच्यासाठी बनवला आहे असं वाटावं. तो कधी यावा याची वेळ मी नाही सांगू शकत. पण जेव्हा केव्हा तिला गरज असेल तेव्हा तो तिच्या आयुष्यात आला पाहिजे असं मला नेहमी वाटतं.” त्याच्या या वक्तव्यानंतर ऋतुज्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe)

ऋतुजा बागवे विषयी बोलायच झाले तर, तिने 2008 मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यासारख्या मालिकेत देखील काम केले आहे. त्यानंतर ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून ऋतुजा झळकली.

अधिक वाचा- 
“आम्ही नक्कीच त्यांना तुमच्यापेक्षा…” गश्मीर महाजनीने ट्रोलिंगवर शेअर केली ‘ती’ पोस्ट म्हणाला…
काय सांगता! प्रेक्षकांच्या अल्पप्रतिसादामुळे शितलीची ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

 

हे देखील वाचा