Sunday, February 23, 2025
Home मराठी साखरपुड़्याला एक महिना पूर्ण होताच, ऋता दुर्गुळेने पतीसोबतचे खास क्षण केले शेअर

साखरपुड़्याला एक महिना पूर्ण होताच, ऋता दुर्गुळेने पतीसोबतचे खास क्षण केले शेअर

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शहा यांचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला. हृता दुर्गुळे मालिका क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दिसण्याने आणि अभिनय कौशल्यावर तिने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. मराठी मनोरंजन  सृष्टीत हा सगळ्यांचा आवडता चेहरा झाला आहे.

ऋता दुर्गुळे (hruta durgule) आणि प्रतीक शहा (prateek shah) यांचा साखरपुडा २४ डिसेंबर रोजी पार पडला. यांच्या साखरपुड्याला एक महिना पूर्ण होताच ऋता दुर्गुळेने आणि प्रतीक शहासोबत रोमँटिक व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या बॅकग्रांउडला तू ऐसा कैसे है हे गाणे लागले आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांच्या साखरपुड्यातील अनेक खास क्षण तिने या व्हिडिओद्वारे शेअर केले आहेत.

त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया दर्शवत आहेत. ऋता ने काही दिवसांपूर्वी ती रिलेशनमध्ये असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली. तिने दिलेल्या या बातमीने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

प्रतीक शहा हे हिंदी मालिकेतील दिग्दर्शक म्हणून असलेल सर्वात मोठे नाव आहे. त्याच्या आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिका झाल्या आहेत. ‘बेहद २’, ‘बहू बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘तेरी मेरी एक जिंदगी’ मालिकांचे दिग्दर्शन त्याने केले आहे.

ऋता दुर्गुळे मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा प्रवास ‘दूर्वा’ या मालिकेपासून झाला तर सर्वाधिक लोकप्रियता तिला ‘फुलपाखरू’ या मालिकेमधून मिळाली. त्यानंतर आता चालू असलेली ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका करत आहे. दादा एक गूड न्यूज आहे या नाटकात देखील ती दिसत आहे. जेवढी लोकप्रियता तिने मालिका क्षेत्रातून कमली आहे तेवढीच लोकप्रियता सिनेमा क्षेत्रातून तीला नक्कीच मिळेल. ऋता दुर्गुळेचा फार मोठा चाहता वर्ग आहे. तिचे आगामी सिनेमे बॉक्स ऑफिसवर येणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा