×

आदित्य नारायणने शेअर केले पत्नीच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटो, श्वेता अग्रवालवर दाखवले प्रेम

टीव्ही होस्ट आणि गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवालच्या घरी लवकर लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येणार आहे. ते दोघेही लवकरच आई-वडील होणार आहेत. ही गोड बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. आदित्यने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पत्नी श्वेताचा बेबी बंपसह एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्याचवेळी आदित्यने आता बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

आदित्यने (Aditya Narayan) इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि श्वेता अग्रवालचे (Shweta Agarwal) फोटो शेअर केले आहेत. हे फोटो श्वेताच्या बेबी शॉवरचे आहेत. फोटोंमध्ये आदित्य आणि श्वेता पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. या फोटोंमध्ये श्वेता बसलेली आहे आणि तिच्या मागे आदित्य नारायण उभा आहे. या फोटोंसोबत आदित्यने कॅप्शनमध्ये “#BabyShower” असे लिहिले आहे आणि इमोजी देखील टाकले आहे. या फोटोंमध्ये श्वेताचा प्रेग्नेंसी ग्लोही स्पष्टपणे दिसत आहे. व्हाइट आउटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

त्याचवेळी आदित्य त्याच्या पत्नीवर खूप प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. आदित्य आणि श्वेता त्यांच्या येणाऱ्या छोट्या पाहुण्याबद्दल खूप खूश आहेत. आदित्यने माध्यमांशी संवाद साधत आनंदाची बातमीही दिली. तो म्हणाला की, “मी आणि श्वेता या टप्प्याची आतुरतेने वाट पाहत होतो. आम्हा दोघांनाही मुलं खूप आवडतात आणि मला वडील व्हायचे होते. पण, श्वेताला डबल ड्युटी करावी लागणार आहे, कारण मी स्वतः लहान मुलासारखा आहे. त्याचवेळी, आम्ही अलीकडे गोल्डन रिट्रीव्हर देखील स्वीकारला आहे. लवकरच आमचे घर हाई ऑक्टेन उर्जेने भरले जाईल.”

सिंगरच्या म्हणण्यानुसार, श्वेताने नर्सिंग होममध्ये आपल्या मुलाला तिच्या मांडीवर घेऊन उभे राहावे, हे त्याचे स्वप्न होते. श्वेताला २०१७ मध्ये तिच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त त्याने आपली इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तोपर्यंत दोघांचा साखरपुडा झाला नव्हता. अशा परिस्थितीत ही गोष्ट त्याच्यासाठी कथेसारखी होती. आता आदित्य म्हणतो की, “मला आनंद होत आहे की,माझे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. आम्ही लवकरच पालक होऊ. संपूर्ण कुटुंबासह, आम्ही लवकरच डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करणार आहोत.”

श्वेता आणि आदित्यने २०१० मध्ये ‘शापित’मध्ये एकत्र काम केले होते. १० वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नाला दोघांचे फक्त कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. आता दोघेही त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत.

हेही वाचा :

Latest Post