लॉकडाऊनमध्ये ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, येत्या गुरुवारपासून ‘या’ वाहिनीवर होणार मालिकेचे प्रेक्षेपण

Television Ramayan serial to be telecast again on this tv channel


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि मागच्या वर्षी सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी मालिका म्हणजे रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही होय. ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी दाखवली जाणार आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती चालली आहे. अशातच जनतेला सकारात्मक ऊर्जा पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी रामायण ही मालिका पुन्हा एकदा दाखवण्यात येणार आहे.

रामायण ही मालिका येत्या गुरुवारपासून कलर्स या वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. 1987 मध्ये पहिल्यांदा रामानंद सागर यांनी बनवलेली रामायण ही मालिका टीव्हीवर दाखवली गेली होती. त्यावेळी या मालिकेने बाकी सगळ्या मालिकांच्या टीआरपीवर चांगलाच परिणाम केला होता. असं म्हणतात की, रविवारी जेव्हा ही मालिका लागायची, तेव्हा सगळीकडे शांतता असायची. रस्त्यावर देखील माणसे फिरकत नसायची. कारण सगळेजण आपापल्या घरी रामायण बघण्यात व्यस्त असायची.

रामायणामध्ये श्रीराम यांच्या अनेक घटनांचा उल्लेख केला होता. श्रीराम यांच्या पात्रातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. रामायणामध्ये अशा अनेक घटना आहेत, ज्या आजही अनेकांना त्यांच्या कठीण प्रसंगावर मात देण्यासाठी उपयोगी ठरतात.

भारतीय टेलिव्हिजनवरील रामायण ही मालिका सर्वात प्रतिष्ठित होती. या मालिकेचे अनेक एपिसोड शूट झाले आहेत. पण मागच्या वर्षी अगदी थोडक्यात याचे प्रक्षेपण केले होते. या मालिकेची लोकप्रियता बघता कलर्स वाहिनीने या मालिकेला पुन्हा एकदा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

रामायण मालिकेत श्रीराम प्रभूंचे पात्र अरुण गोविल यांनी निभावले होते. लक्ष्मणचे पात्र सुनील लहरी, तर सीतेचे पात्र दीपिका चिखलिया यांनी निभावले होते. या कहाणीमध्ये संकटातून बाहेर येण्यासाठी अनेक मार्ग सुचवले आहेत. जे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम हिंदुस्तानी भाऊला मुंबई पोलिसांकडून अटक, काय आहे प्रकरण? घ्या जाणून

-सुपरस्टार दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या हवेली ताब्यात घेण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय; मालकांना बजावली नोटीस

-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल


Leave A Reply

Your email address will not be published.