Saturday, June 29, 2024

शूटिंगवेळी हॉस्पिटलमधून ‘या’ अभिनेत्याला घेऊन धावताना दिसला थालापती विजय, व्हिडिओ जोरदार व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. साऊथ सुपरस्टार थालापती विजय हा सध्या त्याच्या ‘वरिसू’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. अशात सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ लीक झाला आहे, जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्यातरी रुग्णालयातील असल्याचे दिसते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये थालापती विजय (Thalapathy Vijay) आणि प्रभू स्ट्रेचवर अभिनेता सरथकुमार (Sarathkumar) याला घेऊन धावताना दिसत आहेत. या व्हिडिओतून स्पष्ट होते की, रुग्णालयातील कोणीतरी हा व्हिडिओ लपून शूट केला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

थालापती विजय याचा हा व्हिडिओ (Thalapathy Vijay Film Varisu Video) समोर आल्यानंतर चाहते हा व्हिडिओ इंटरनेटवरून हटवण्याची मागणी करत आहेत. कारण, सिनेमाची उत्सुकता तशीच राहावी असे चाहत्यांना वाटत आहे. ‘वरिसू’ हा विजयचा तमिळ आणि तेलुगू असा द्विभाषिक सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन टॉलिवूड दिग्दर्शक वामसी हे करत आहेत. वामसी यांना ‘तोझा’ या सिनेमासाठी ओळखले जाते.

या सिनेमात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका आणि विजय हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. या सिनेमात शाम, सरथकुमार, योगी बाबू, आणि प्रभू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या गाण्याचे संगीत थमन हे तयार करत आहेत.

थालापतीचे पात्र
‘वरिसू’ या सिनेमातीला थालापती विजयच्या पात्राबद्दल बोलायचं झालं, तर असे म्हटले जात आहे की, तो एका ऍप डिझायनर व्यक्तीच्या भूमिकेत झळकणार आहे. निर्मात्यांनी आगामी प्रोजेक्टबद्दल मौन बाळगले आहे. अशात अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, हा सिनेमा २०२३ मध्ये पोंगल सणाच्या दिवशी प्रदर्शित केला जाईल. ‘वरिसू’ या सिनेमाची शूटिंग चेन्नई, हैदराबाद आणि विशाखापट्टणम यांसारख्या ठिकाणी झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
इवल्याशा वयातही फोटोसाठी पोझ देताना दिसली आलियाची भाची, चाहते म्हणाले, ‘ही तर डिट्टो रणबीरसारखी दिसते’
आनंदाची बातमी! बिपाशाने फोटो शेअर करत एकदाचं सांगूनच टाकलं, पाहून तुम्हीही व्हाल खुश
‘या’ आहेत हिट सिनेमे देणाऱ्या मांजरेकरांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी, महेश बाबूच्या पत्नीसोबत होतं अफेअर?

हे देखील वाचा