Thursday, March 28, 2024

गमतीशीर व्हिडीओ शेअर करत जावेद अख्तर यांची राजकिय पक्षांवर कडाडून टीका

गेल्या काही दिवसांपासून थंडी जरा वाढलीये ना भाऊ… शेकोटी पेटवून जर शेक घेत असाल, चांगल्या गप्पा रंगत असतील. हेच व्हायला हवं आणि हे थंडीत नाही होणार मग कधी होणार? जरा विचार करा थंडी वाढली की आपण ज्याप्रमाणे शेक घ्यायला शेकोटी पेटवतो आणि एकत्र येतो त्याप्रमाणे प्राणी पक्षी एकत्र आले तर… असं घडलंय आणि याचा पुरावा खुद्द महान लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दिला आहे. विचारवंत अख्तरच ते… यावरही एखाद दुसरी कोपरखळी नाही मारली असं होणारच नाही. असं काय शेअर केलं आहे अख्तर साहेबांनी चला पाहुयात.

बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते बऱ्याचदा चाहत्यांसह गमतीदार व्हिडिओ शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून असाच एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्र्याचं पिल्लू आणि मांजर भट्टीशेजारी बसून शेकताना दिसत आहेत.

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ रिट्वीट केला. यासोबत त्यांनी आणखीन एक ट्विट केलं ते म्हणजे, या मुक्या प्राण्यांना काही राजकीय पक्षांपेक्षा जास्त चांगल्या प्रकरचा सेन्स असतो. या व्हिडिओमध्ये कुत्रा आणि मांजर, जे एकमेकांचे शत्रू आहेत,परंतु थंडीत शेकोटी घेण्यासाठी ते एकत्र बसलेले दिसत आहेत. अर्थात, या दोघांची मैत्री पाहण्यासारखी आहे. चाहते या व्हिडिओवर बर्‍याच कमेंट करत आहेत आणि त्यांचा अभिप्राय देत आहेत.

जावेद अख्तर हे शायर आणि हिंदी चित्रपटांचे गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. सीता और गीता, जंजीर, दीवार आणि शोले या चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद यामुळे ते प्रसिध्द आहेत. सलीम खानबरोबर तर त्यांनी सलीम-जावेदची जोडी म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी गाणी लिहणे सुरूच ठेवले. धर्मनिरपेक्षता आणि मुक्त विचारसरणीला चालना देण्याच्या योगदानाबद्दल त्यांना २०२० मध्ये रिचर्ड डॉकिन्स पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

हे देखील वाचा