Saturday, July 27, 2024

चंदन तस्करी, शेकडो लोकांचे बळी; अंगावर काटा आणणारा ‘वीरप्पन’चा ट्रेलर रिलीज

जर तुमचा जन्म 80 आणि 90 च्या दशकात झाला नसेल, तर तुम्हाला वीरप्पन या डाकूच्या दहशतीबद्दल नक्कीच जास्त माहिती नसेल. पण हे नाव तुम्ही तुमच्या घरातील  वडिलधाऱ्या लोकांकडून नक्कीच ऐकलं असेल. आता जर तुम्हाला या डाकूच्या भीतीची कहाणी जाणून घ्यायची असेल आणि जवळून पहायची असेल, तर ती पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्स ‘द हंट फॉर वीरप्पन’ नावाची माहितीपट मालिका घेऊन येत आहे. त्याची पहिली झलक म्हणजे त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या या माहितीपट मालिकेचा (The Hunt for Veerappan Teaser) ट्रेलर खूपच दमदार दिसत आहे. जे वीरप्पन विषयी माहिती देत आहे. वीरप्पनसारखा गुन्हेगार कधीच झाला नसल्याचं म्हटलं जाते. देशातील दोन राज्यात त्याची दहशत होती आणि सर्व शक्ती पणाला लावूनही त्याला पकडणे शक्य होत नव्हते. असे म्हणतात की, तो जंगली प्राण्यासारखा होता. जवळपास 30 वर्षे वीरप्पनची भीती कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कायम होती. जिथे तो जंगलात राहत होता आणि त्याचा मुख्य व्यवसाय चंदनाची तस्करी हा होता.

यानंतर वीरप्पनने हत्तीच्या दातांची तस्करीही सुरू केली. 2004 मध्ये त्याचा मृत्युव झाला आहे. नुकताच त्या वेब सिरीजटा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये वीरप्पनने 119 लोकांची हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. हा ट्रेलर शेअर करताना नेटफ्लिक्सने लिहिले की, “एका तस्कराची माफिया बनण्याची कहाणी.” शेकडो लोकांना ठार मारण्याबरोबरच त्याने 2000 हून अधिक हत्तींचीही शिकार केल्याचे सांगितले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

‘द हंट फॉर वीरप्पन’ विषयी सांगायच झाले तर, ही मालिका हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ती 4 ऑगस्टला रिलीझ होणार आहे. या आगोदर यावर एक चित्रपट देखील आला होता.2016 मध्ये वीरप्पनवर याच नावाने एक चित्रपट आला आला होता. (‘The Hunt for Veerappan’ web series teaser released on Sandalwood smuggling, hundreds of victims)

अधिक वाचा- 
‘हा’ अभिनेता आजरी आईसोबत ५ तास अडकला ट्रॅफिकमध्ये, लाईव्ह व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
तेजश्री प्रधानला मिळाली नवी मालिका; अभिनेत्रीनं खास व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

हे देखील वाचा