कपूर खानदानाच्या रागामागील सत्य माहितीये?, ऐका खुद्द नीतू कपूर यांच्या तोंडून

कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याचा ‘द कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या पर्वासह परतला आहे. हे पर्व सर्वांना आवडत आहे. कलाकार दर आठवड्याला शोमध्ये येतात आणि खूप मजा करतात. अशातच या आठवड्यात नीतू कपूर आणि त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी या दोघी शोमध्ये दिसणार आहेत. नीतू आणि रिद्धिमा कपिलच्या शोमध्ये खूप मजा करणार आहेत. शोमध्ये, नीतू त्यांच्या कुटुंबाच्या खोट्या रागाबद्दल सांगणार आहेत. ज्याबद्दल ऐकून सगळेच खूप हसतील.

सोनी टीव्हीने शोचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये कपिल नीतू सिंग यांना कपूर कुटुंबाविषयी बोलतो, तेव्हा त्या म्हणतात की, कपूरकडे ना खोटा अहंकार आहे, कपूर अहंकार. वरून रुबाब, आतून लल्लू आहे. आई नीतूचे हे बोलणे ऐकून त्यांची मुलगी रिद्धिमाला धक्का बसतो. नीतू सिंगकडून हे ऐकून कपिल आणि अर्चना मोठ्याने हसायला लागतात.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

ऋषी कपूर यांची आठवण
सोनी चॅनेलने शोचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात कपिलने त्या वेळची आठवण सांगितली, जेव्हा प्रोडक्शन टीमने ऋषी कपूर यांना एपिसोडसाठी आमंत्रित केले होते. नीतू यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत यावे अशी त्यांची इच्छा होती, पण त्यांना विनंती कशी करावी, हे समजत नव्हते. तो म्हणाला की, “ऋषी सर येणार होते, प्रत्येकजण घाबरले होते की, त्यांना नीतू मॅडमला सोबत आणण्यास कसे सांगावे. जेव्हा निर्मिती संघाने त्यांना कॉल केला की, ‘सर नीतू मॅमला बोलवायचे आहे.’ त्यावर ऋषी सर म्हणाले की, ‘मग नीतूला कॉल करा ना, मला का कॉल केला आहे?’”

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

पुढे कपिल म्हणाला की, “मी रात्री १० वाजता नीतू मॅमला फोन केला आणि मॅमला विचारले, ‘ऋषी जी तुमच्यासोबत नाहीत ना?’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘जर माझे पती रात्री १० वाजता माझ्याबरोबर नसतील, तर मग आणखी कुठे असेल.'”

ऋषी कपूर आणि नीतू सिंग २०१७ मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते, तेव्हा ते ऋषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्राच्या प्रमोशनसाठी आले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिद्धार्थच्या अंतिम दर्शनाला पोहचली संभावना, ‘या’ कारणामुळे पोलिसांनी लगावली तिच्या पतीच्या कानशिलात

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

Latest Post