भीमा कोरेगाव प्रकरणी चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. विवेक अग्निहाेत्री यांनी न्यायाधीश एस मुरलीधर यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. कारण, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी त्यांनी कार्यकर्ता गौतम नवलखा यांचा जामीन मंजूर केला होता. मात्र, माफी मागितल्यानंतरही विवेक अग्निहोत्रीला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयाने त्यांना 16 मार्चला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
गौतम नवलखा (gautam navlakha) यांना दिलासा देण्याच्या आदेशामुळे विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri ) यांनी न्यायाधीश मुरलीधर यांच्यावर पक्षपाताचा आरोप केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत विवेक अग्निहोत्री आणि आनंद रंगनाथन यांच्या विरोधात 2018 मध्ये अवमान नोटीस जारी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याच्यावर कारवाई सुरू केली.
इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी चित्रपटावर केले वादग्रस्त विधान
विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. बॉलीवूडच्या यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश आहे. या सिनेमात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आदींनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्सवर वादग्रस्त विधान केले होते. त्याने या चित्रपटाला ‘वल्गर’ म्हटले होते, ज्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला हाेता.
अग्नहाेत्रीने दिले बाॅलिवूडला ‘हे’ दमदार चित्रपट
विवेक अग्निहाेत्री यांच्या विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘द दिल्ली फाइल्स,’ ‘द ताशकंद फाइल्स’, ‘चॉकलेट डीप डार्क’, ‘माेहम्मद और उर्वशी’ यासारखे दमदार चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. (the kashmir files movie director vivek agnihotri apologises to delhi hc for remark in gautam navlakha case)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
क्या बात है! वरुण सूदसोबत ब्रेकअपनंतर दिव्याने केला बिझनेसमनशी साखरपुडा, फोटो व्हायरल
बिग ब्रेकींग! ज्येष्ठ रंगकर्मी माेहनदास सुखटणकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास