Tuesday, January 31, 2023

क्या बात है! वरुण सूदसोबत ब्रेकअपनंतर दिव्याने केला बिझनेसमनशी साखरपुडा, फोटो व्हायरल

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल हिने 5 डिसेंबर रोजी तिचा 30वा वाढदिवस मित्र आणि कुटुंबासह साजरा केला. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी एक मेगा बॅश आयोजित केला होतं, ज्यामध्ये मनोरंजन जगतातील कलाकार उपस्थित होते. तिच्या वाढदिवशी दिव्याने बिझनेसमन अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल तुफान होत आहेत. अलीकडेच नऊ महिन्यांपूर्वी अभिनेत्रीचे वरुण सूदसोबत ब्रेकअप झाले होते.

दिव्या अग्रवाल (divya agarwal) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपूर्व पाडगावकरसोबतचे फोटो शेअर करून एंगेजमेंट झाली असल्याचे सांगितले आहे. दिव्याच्या 30 व्या वाढदिवशी अपूर्व पाडगावकरने तिला अंगठी घालून प्रपोज केले. समोर आलेल्या फाेटाेंमध्ये, दिव्या तिची अंगठी देखील दाखवत आहे आणि अपूर्वसोबत रोमँटिक पोज देत आहे. दिव्या पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये, तर अपूर्व काळ्या रंगाच्या शर्टमध्ये खूप सुंदर दिसत आहे. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

divya-agarwal
Photo Courtesy: Instagram

हे फोटो शेअर करत दिव्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी कधी हसू थांबवू शकेन का? कदाचित नाही. जीवन उजळ झाले आहे आणि मला हा प्रवास शेअर करण्यासाठी योग्य व्यक्ती सापडली आहे. त्याचे #BaiCo कायमचे वचन. या दिवसापासून मी कधीही एकटी फिरणार नाही.” दिव्याची ही पोस्ट पाहून चाहते आणि कलाकार तिचं अभिनंदन करत आहेत. दिव्या अग्रवालचा हाेणारा नवरा अपूर्व एक बिझनेसमन आहे आणि त्याचे मुंबईत अनेक रेस्टॉरंट आहेत.

दिव्या अग्रवालबद्दल सांगायचे झाले, तर यापूर्वी ती वरुण सूदला अनेक वर्षांपासून डेट करत होती. त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या हाेत्या, पण या वर्षी मार्चमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून वरुण आणि तिच्या ब्रेकअपची माहिती दिली. त्याचवेळी, आता नऊ महिन्यांनंतर अभिनेत्रीने अपूर्वाशी साखरपुडा केला आहे. (actress divya agarwal announced her engagement with businessman apurva padgaonkar after breakup from varun sood)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
माेठी बातमी! ‘इमली’ फेम अभिनेत्रीचा अपघात, शूटिंगवरून घरी परतत असताना ट्रकने घासत नेली कार
छान किती दिसते फुलपाखरु, पाहा रकुलची फाेटाे गॅलरी

हे देखील वाचा