भन्साळींच्या डोक्याला ताप! काँग्रेसच्या बड्या नेत्याने केली ‘गंगुबाई काठियावाडी’चे शीर्षक बदलण्याची मागणी


हल्ली कोणताही चित्रपट असो वा वेबसीरिज प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या कचाट्यात सापडणार नाही, असे कधी होणार नाही. यात संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांचे नाव घेण्यास काहीच हरकत नाही. भन्साळी आणि त्यांच्या चित्रपटाचे वाद ही काही नवीन गोष्ट नाही. या आधीही त्यांचे बरेच चित्रपट आहेत, ज्यांना वादाला सामोरे जावे लागले होते. यात मुख्यत: रामलीला आणि पद्मावत या चित्रपटांची नावे आवर्जून घेण्यात येतात. आता पुन्हा एकदा त्यांचा एक नवीन चित्रपट हा वादाच्या भोवऱ्यात भलताच अडकला आहे, त्यातून बाहेर पडणे फार मुश्किल असल्याचे म्हटले जात आहे.

संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट म्हणजे ‘गंगुबाई काठियावाडी’. या चित्रपटाच्या नावावरून अनेक वाद सुरू झाले आहेत. अशातच यामध्ये महाराष्ट्रातील आणखी एका विधानसभेच्या आमदाराची भर पडली आहे, ज्यांनी या चित्रपटाचे नाव बदलून टाकावे अशी मागणी केली आहे. या चित्रपटाची कथा हुसैन जैदी यांच्या ‘मुंबईच्या माफिया क्वीन’ या पुस्तकावर आधारित आहे. ज्यात ही कथा रेड लाईट क्षेत्रातील कामाठीपुरा भागात काम करणाऱ्या गंगुबाई हिच्या जीवनावर आधारित आहे. ज्यात आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत अजय देवगण स्क्रीन शेअर करणार आहे.

गंगुबाई काठियावडी या नावाने ‘काठीवाड’ शहराचे नाव खराब होत आहे. त्यामुळे या चित्रपटावर आक्षेप घातला गेला. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी हे नाव बदलून टाकावे अशी मागणी केली आहे. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्या मते, कामाठीपुरा हा परिसर आता तसा नाही राहिला, जसा पूर्वीसारखा होता. हा परिसर खूपच बदलला आहे. आज पाहायला गेले तर तिकडे कमालीचे बदल झालेले दिसून येतात. त्यामुळे या चित्रपटात काहीच तथ्य नसल्याचे ते सांगतात.

याआधी सुद्धा कामाठीपुरा तेथील रहिवाशांनी मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी संवाद साधला होता. ‘कामाठीपुरा’ या नावाचा उल्लेख चित्रपटातून काढावा अशी मागणी त्यांनी केली होती. खुद्द गंगुबाई यांच्या मुलाने देखील या चित्रपटाच्या कथेवर आक्षेप घेतला होता.

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत या चित्रपटावर प्रेक्षकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी देशभरात या सिनेमाच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. अनेकांचा असा आरोप आहे की, या चित्रपटातील बऱ्याच गोष्टी या चुकीच्या पद्धतीने मांडल्या गेल्या आहेत. तसेच राजपूत समुदायाला चुकीचे दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यामुळे नंतर काही दृश्ये आणि शीर्षक यांच्यात बदल करून चित्रपट रिलीझ केला होता.

‘रामलीला’ या चित्रपटाच्या नावावरुन ही बरेच वाद झाले होते हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी काहींनी दिली गेली होती. त्यामुळे नाईलाजाने भन्साळींनी या चित्रपटाचं नाव बदलून ‘गोलियों की रासलीला-रामलीला’ असं केले होते. क्षत्रिय समाजातील लोकांची चुकीची प्रतिमा दाखवली जात असल्याचा आरोप या चित्रपटावर केला गेला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.