इतर कोट्यवधी लोकांप्रमाणेच श्रेयसी आणि शौनकसुद्धा पहिल्या लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या घरातच होते. यापूर्वी ते एकमेकांना ओळखत असले, तरीही संगीत, लेखन आणि रचना यातल्या त्यांच्या समान आवडी- निवडीमुळे त्यांना या टप्प्यात इंस्टाग्रामवर अधिक खोलवर कनेक्ट होण्यास मदत झाली.
भेटल्यावर त्यांनी त्यांच्या कल्पनांची देवाणघेवाण केली आणि सुंदर संगीतमय रचना तयार केल्या. संगीताचा आनंद घेत असताना पुढे काय आहे हे माहित नव्हते, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रेयसी आणि शौनक आता ‘श्रेयसीशौनक’ बनले आहेत. या जोडीने आता एक संगीतकार म्हणून संगीताच्या दुनियेत प्रवेश केला आहे.
असे म्हणतात ना, “प्रत्येक ढगाला चांदीचे अस्तर असते.” श्रेयसी आणि शौनकने आपल्याला तेच दाखवून दिले. त्यांनी लॉकडाऊनच्या कठीण कालावधीचा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग केला. ज्यायोगे नकारात्मक परिस्थितीत असूनही सकारात्मक परिणाम कसा साध्य केला जाऊ शकतो हे दर्शविले.
त्यांना भेटून एक वर्ष झाले आहे आणि त्यांचा पहिला ट्रॅक ‘तुझ संग लागी’ १३ एप्रिल, २०२१ रोजी रिलीज झाला आहे. श्रेयसी आणि शौनक जसे एकत्र आले, तसंच संगीतही कनेक्ट करते, असा त्यांचा विश्वास आहे. संगीताद्वारे जगापर्यंत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
श्रेयसी आणि शौनक आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत, कारण त्यांनी नेहमीच सकारात्मक बाजूकडे पाहिले आहे. वेगवेगळ्या व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेले असूनही, संगीत तयार करण्यात आणि घरात अडकलेल्या मित्रांसह ते शेअर करण्यात त्यांना समाधान वाटत आहे.
श्रेयसी आणि शौनक यांच्यासोबत झालेल्या या मुलाखतीत त्यांनी त्यांचा प्रवास, संगीत आणि त्यांच्या आवडी- निवडी याविषयी चर्चा आम्ही केली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
यावेळी त्यांना विचारले की, ‘आम्हाला तुमच्या विषयी जाणून घ्यायला आवडेल! श्रेयसीशौनाक कसे घडले?’ याचे उत्तर देताना ते म्हणाले की, “कोव्हिड- १९ ही महामारी जगभर पसरली आणि आपल्या सर्वांना घरातच राहावे लागले. त्यामुळे बर्याच लोकांच्या नोकर्या गमावल्या आणि हवेत खूपच अनिश्चितता निर्माण झाली. आम्हा दोघांनाही आमचे व्यावसायिक नुकसान सहन करावे लागले. आम्ही सहयोगी बनवण्यासाठी आणि कंटेंट तयार करण्यासाठी डिजटल प्लॅटफॉर्म वापरणारे लोक पाहिले. लॉकडाऊनमुळे सामाजिक समागमाची समाप्ती झाली आणि डिजिटल सोशलायझिंग सुरू झाले. काही प्रमाणात आम्ही या ट्रेंडचेही अनुसरण केले, पण मग आम्ही विचार केला की अडकलेल्या, नोकरी गमावलेल्या, निराश झालेल्यांवर सकारात्मक परिणाम का होऊ नये? आम्हाला वाटते की संगीत आपल्या सर्वांना एकत्रित करते आणि अशी आशा देखील देते की गोष्टी लवकरच अधिक चांगल्या होतील. त्यावेळी श्रेयसीशौनक ही संकल्पना बनू लागली.“
यानंतर त्यांना संगीताबद्दल पुढचा प्रश्न विचारला गेला की, “आपले संगीत काय आहे आणि ते इतरांपेक्षा कसे वेगळे आहे?” याचे उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही एक संगीत जोडी आहोत आणि आम्ही दोघेही गायन, गीतलेखन आणि संगीत रचनांमध्ये समान भाग घेतो. आमचे संगीत ब्लूज, हिंदुस्तानी आणि रॉक दरम्यानच्या अनेक शैलींचे प्रतिबिंब आहे. आम्ही आमच्या संगीताची खरोखर इतरांशी तुलना करू शकत नाही. परंतु हो, आम्ही संबंध, प्रेरणा, सर्वसमावेशकता आणि स्वीकृती यावर गाणी लिहिण्यास आणि तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत.”
श्रेयसीशौनकला तिसरा प्रश्न विचारला की, “तुमची प्रेरणा कोण आहे?” याचे उत्तर देताना ते म्हणाले की, “काही नावे सांगणे खरोखरच अवघड आहे, कारण असे बरेच लोक आहेत जे आम्हाला प्रेरणा देतात, पण जर काही नावे सांगायची झाली, तर आम्ही एसडी बर्मन सर, आरडी बर्मन सर, मदन मोहन, रफी साहब, लता जी, आशा जी, किशोर कुमार, एआर रहमान सर, अमित त्रिवेदी, शंकर एहसान लॉय आणि बरेच काही.”
यानंतर त्यांना त्यांच्या आगामी गाण्यांवर आधारित प्रश्न विचारला की, “पुढे काय? आणखी गाणे रिलीझ होणार आहेत का?“ याचे उत्तर देताना त्यांनी म्हटले की, “आम्ही निश्चितपणे या वर्षी ८ गाणी रिलीज करण्यास उत्सुक आहोत. तसं आमचं पहिलं गाणं ‘तुझ संग लागी’ हे सर्व संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर आपल्याला सर्व अपडेट्स मिळतील, त्याचे युजरनेम @ShreyasiShaunak आहे. याव्यतिरिक्त आम्ही तुम्हा सर्वांसाठी काही मराठी गाणी गाण्यासाठी उद्या म्हणजेच १३ मे रोजी रात्री ८.३० वाजता दैनिक बोंबाबोंबच्या फेसबुक पेजवर लाईव्ह जाणार आहोत.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’
-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप