बॉलिवूडमध्ये लग्न, घटस्फोट, अफेअर, लिव्ह इन रिलेशनशिप, भांडणं, ब्रेकअप्स, फ्रेंडशिप अशा नानाविध गोष्टींच्या चर्चा दररोज सुरूच असतात. काही अपवाद सोडले, तर प्रत्येक अभिनेता या सर्वांमधून एकदा का होईना पण जातोच. या सर्व चर्चांमध्ये मीडियाचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे खिलाडी अक्षय कुमार. सध्या अक्षय फॅमिली मॅन आहे. पण एकेकाळी अक्षयचंही नाव बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. यातील सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे पूजा बत्रासोबतचं. कारण तिनंच तर अक्षयला बॉलिवूडची दारं उघडून दिली होती. पण नंतर असं काय झालं की, दोघांच्याही नात्यात कटूता आली आणि त्यांना ब्रेकअप करावं लागलं? याबाबत आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
पूजा अन् अक्षय यांची भेट झाली ते दशक होतं नव्वदचं. तो काळच असा होता की, त्यादरम्यान अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडत होते. याच काळात अक्षयही आपल्या अभिनय करिअरची गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत होता, तर पूजा त्यावेळी मॉडेलिंगच्या दुनियेतील प्रसिद्ध नाव होतं. पूजा अन् अक्षयची भेट हळूहळू मैत्रीत बदलली. पूजा ही प्रसिद्ध मॉडेल असल्याने तिला मोठमोठ्या पार्ट्यांचे आमंत्रण येणे साहजिक होते. त्यामुळे पूजाही अक्षयला प्रत्येक पार्टीत घेऊन जायची. इतकंच नाही, तर ती अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडे अक्षयची शिफारस करायची की, त्याला काम भेटेल. आता जर कुणी स्वत:च्या हाताने घास भरवत असेल, तर कोण खाणार नाही…? अक्षयनेही या संधीचा फायदा उचलला.
तो प्रत्येक पार्टीत पूजासोबत जाऊ लागला. दोघेही हातात हात घालून फिरू लागले. त्यांना पाहून चाहत्यांना वाटू लागले होते की, अक्षय बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यात यशस्वी तर होईलच. मात्र, पूजासोबत त्याची जोडी चांगली आहे आणि हे नातं दीर्घकाळ टिकेल. पण घडलं भलतंच.
अक्षयला जे नाव आणि प्रसिद्धी हवी होती, ते सर्व त्याला मिळू लागलं होतं. जशी त्याला पूजासोबत पार्ट्यांमध्ये जाऊन मिळाली होती. अक्षय आता एक हिरो म्हणून नावारुपाला येऊ लागला होता. इतकेच नव्हे, तर प्रत्येक अभिनयात रुळलेल्या अभिनेत्याला जसे मूव्ही मिळतात, तसेच मूव्ही अक्षयलाही मिळू लागले होते. मात्र, जिने अक्षयला बॉलिवूडमध्ये आणलं. तीच पूजा या इंडस्ट्रीत आपली जागा बनवण्यासाठी स्ट्रगल करत होती. दोघांच्याही नात्यात दुरावा आला, यामागे कारण होतं त्यांचं करिअर. हे तर साहजिकचंय. नाही का मंडळी.
हेही पाहा- अक्षय कुमारच्या जीवनातील सर्वात वादग्रस्त अफेअर, ज्याची चर्चा आजही होते
अक्षय अन् पूजाचं नातं दीर्घकाळ टिकेल लोकांनी लावलेला अंदाज मात्र चुकला. त्यांच्या नात्याला तिथंच फुलस्टॉप लागला. प्रेमाच्या नात्याचं जाऊच द्या, पण त्यांचं मैत्रीचं नातं आजही कायम आहे. ते आजही त्याचप्रकारे एकमेकांना भेटतात, ज्याप्रकारे ते सुरुवातीला भेटायचे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-