Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसले मालिका सोडणार? पोस्ट करत म्हणाली, “तुमचे आशीर्वाद घेऊन…”

मराठी मनोरंजन क्षेत्रात मालिकांनी आपला चाहत्यांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे. सध्या चालू असलेल्या मालिकांपैकी ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या मालिकेत ‘संजना’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपाली भोसलेने घराघरात ओळख निर्माण केली आहे.

रूपाली (Rupali Bhosle) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. रूपालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. रूपालीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाइक आणि कमेंट करत असतात. या मालिकेत तिने साकारलेल्यानकारात्मक भूमिकेला लोकांनी चांगली पसंती दर्शवली आहे. या दरम्याम रुपालीने नुकतचं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियाव नव्या चर्चांना उधाण आले आहे.

पोस्ट शेअर करताना रूपालीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “खूप ग्रेट भेट… सुरेश वाडकरजी आणि पद्मा वाडकरजी तुमचे आशीर्वाद घेउन मी पुढच्या प्रवासाला निघाले आहे. मला खत्री आहे हा प्रवास खूप सुखकर होणार आहे. आम्ही आजही एन्जॉय करत असलेली इतकी अप्रतिम गाणी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..तुम्हा दोघांना भेटून मला आनंद झाला आहे.” रूपालीने केलेली पोस्ट पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळे अंदाज वर्तवत आहेत. ती आता मालिकेतून ब्रेक घेणार का असा प्रश्न चाहत्यांसमोर उपस्थीत झाला आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले विषयी बोलायच झाले तर, रूपाली ‘बिग बॉस मराठी’मधून प्रेक्षकांसमोर आलेली. त्यानंतर तिने ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रुपालीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. रुपाली म्हणते तिला अनेक नवनवीन भूमिका करायच्या आहेत. (The social media post of ‘Aai Khe Kya Karte’ fame actress Rupali Bhosle is in discussion)

अधिक वाचा-
HAPPY BIRTHDAY | ​​’एमएस धोनी’ चित्रपटापेक्षा वेगळी आहे ​​माहीची लव्हस्टोरी? ‘अशी’ झाली होती साक्षीसोबत पहिली भेट
‘जवान’ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च हाेण्यापूर्वी नयनताराचा लूक झाला लीक? साेशल मीडियावर उडाली खळबळ

हे देखील वाचा