Tuesday, May 21, 2024

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरची ‘ती’ पोस्ट व्हायरल; म्हणाली, ‘मी पदाचा राजीनामा..’

आई कुठे काय करते? या मालिकेतून प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभुलकर होय. मराठीमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असणाऱ्या मधुराणीला या मालिकेतून एक नवीन ओळख मिळाली आहे. मधुराणी मूळची पुण्याची आहे. तिचे कुटुंब देखील पुण्यातच राहते. मात्र मालिकेची शूटिंग मुंबईमध्ये असल्यामुळे मधुराणी मुबंईत असते. यादरम्यान मधुराणी विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही (aai kuthe kay karte)  मालिका चाहत्यांच्या मनावर चांगलीच वर्चस्व गाजवत आहे. मधुराणी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यादरम्यान मधुराणीने एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या पोस्टला चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसतात.

अनेकदा मधुराणी (madhurani prabhulkar ) तिच्या पोस्टमुळे चर्चेत येते. मालिकेतील तिच्या समंजस पात्राचे सर्वजण तोंडभरून कौतुक करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने पोस्ट करत मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड यां संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत आली आहे.

मधुराणीने पोस्ट करताना लिहिले की, “कृपया नोंद घ्यावी. मिरॅकल्स अकॅडमी ऑफ आर्टस् अँड प्रायव्हेट लिमिटेड ही मी आणि प्रमोद (प्रभुलकर) आम्ही दोघांनी मिळून सुरु केलेली खूप चांगली संस्था आहे. अभिनय प्रशिक्षणाबरोबरच इतरही अनेक कल्पक उपक्रम संस्थेमार्फत आम्ही राबवले आहेत. परंतु माझ्या विविध क्षेत्रातील वाढलेल्या व्यस्ततेमुळे मला संस्थेच्या दैनंदिन कार्यकारिणीत लक्ष देण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळ समन्वयाने निर्णय घेत मी संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. संस्थेशी माझा आता कोणताही संबंध राहिलेला नाही, तरी माझ्या शुभेच्छा कंपनी सोबत कायम असतीलच.”

मधुराणी प्रभुलकर विषयी बोलायच झाल तर, याआधी मधुराणीने ‘सुंदर माझं घर’, ‘गोड गुपित’, ‘समांतर, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘आई कुठे काय करते’मधील तिच्या आईच्या भूमिकेला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. (television aai kuthe kay karte fame actress madhurani prabhulkar resign from miracles academy of arts and media see post)

अधिक वाचा- 
तारा सिंग अन् सकिना पुन्हा हरवले एकमेकांच्या प्रेमात, ‘गदर 2’चे पहिले गाणे रिलीज
धर्मेंद्र यांनी भावूक पाेस्ट शेअर करून मुलींची मागितली माफी; लेक ईशा देओल म्हणाली, ‘तुम्ही सर्वोत्तम आहात’

हे देखील वाचा