Thursday, June 13, 2024

खुशखबर! ‘खळगं’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, चाहत्यांनी केला शुभेच्छाचा वर्षाव

‘खळगं’ शब्द कानावर आला की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतेती भाकरी. पोटाच खळगं भरण्यासाठी किती कष्ट करावे लागतात या विषयी आणि समाजात गरीब लोकांच जीवन कस आहे याविषयी माहिती देणारा हा चित्रपट आहे. रोमांचकारी, थरारक आणि रहस्यमय विषयावर थेट भाष्य करणारा आणि समाजातील वास्तववादी बाजू मांडणाऱ्या खळगं या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

या टीझरला समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे निर्मित कार्तिक दोलताडे याची प्रमुख भूमिका या चित्रपटात रसिकांना पाहावयास मिळणार आहे. धुमस, मजनू, मुसंडी अशा दर्जेदार चित्रपटांच्या यशा नंतर दिग्दर्शक दोलताडे त्यांची नवीकोरी कलाकृती रसिकांच्या भेटीला त्यांनी आणली आहे.

दोलताडे म्हणाले की,”खळगं हा चित्रपट रोमांचकारी, थरारक आणि रहस्यमय विषयावर थेट भाष्य करणारा आणि समाजातील वास्तववादी बाजू मांडणारा आहे. या चित्रपटकडून मला मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. हा चित्रपट रसिक प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल अशी मला आशा आहे.”

चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले की, “आमची ही नवी कलाकृती रसिकांच्या मनाचा ठाव घेईल. या चित्रपटात  खळगं हा चित्रपट 15 सप्टेंबर 2023 ला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.” या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उसुक्ता निर्माण झाली आहे. (The teaser of the movie Khalaga which presents the realistic side of the society, was met by the fans)

अधिक वाचा- 
‘किरकोळ नवरे’ नवं नाटक रंगभूमीवर घालणार धुमाकूळ; ‘या’ तारखेला हाेणार शुभारंभाचा प्रयाेग
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली

हे देखील वाचा