Thursday, June 13, 2024

‘किरकोळ नवरे’ नवं नाटक रंगभूमीवर घालणार धुमाकूळ; ‘या’ तारखेला हाेणार शुभारंभाचा प्रयाेग

माझ्या नवऱ्याची बायको‘ या मराठी मालिकेत अभिनेत्री अनिता दातेने साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिची ही भूमिका खूप गाजली. या मालिकेनंतर आता ती नव्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या खमक्या स्वभावाने नवऱ्याला वठणीवर आणणारी राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते आता किरकोळ नवरे शोधतेय. ती किरकोळ नवरे का आणि कशासाठी शोधतेय? हे जाणून घ्यायचं असेल तर 11 ऑगस्टला रंगभूमीवर येणारं ‘किरकोळ नवरे’ हे नवं नाटक तुम्हाला बघावं लागेल.

हसून हसून दमछाक करणार डामचिक नाटक अशी टॅगलाईन असलेल्या या नाटकात अभिनेत्री अनिता दाते हिच्यासोबत सागर देशमुख, पुष्कराज चिरपुटकर दिसणार आहेत. अनामिका आणि युवांजनी नाटक मंडळी निर्मित, साईसाक्षी प्रकाशित किरकोळ नवरे ( Kirkol Navare)  या नाटकाचे लेखन -दिग्दर्शन सागर देशमुख याचे आहे.

आजवर वेगवेगळया भूमिकांमधून या तिघांनी आपली कमाल दाखवली आहे. आता एकत्र येत हे तिघे काय धमाल करतात यासाठी हे नाटक पहायला हवं. मनोरंजनातून अंजन घालणारे हे नाटक करताना आम्ही खूप मजा करतोय. प्रेक्षकही हे नाटक तितकचं एन्जॉय करतील असा विश्वास हे तिघे व्यक्त करतात.

किरकोळ नवरे हे विनोदी नाटक नवरा बायकोच्या नात्याबद्दलचं आहेच, पण नात्यातली असुरक्षितता आणि चिरंतर प्रेमाबद्दलही बोलणारं आहे. या नाटकाचे निर्माते अभिजीत देशपांडे, राहुल कर्णिक, दिनू पेडणेकर आहेत. दिग्दर्शन सहाय्य कल्पेश समेळ तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. संगीत सौरभ भालेराव यांचे असून गीते जितेंद्र जोशी यांनी लिहिली आहेत. प्रकाशयोजना विक्रांत ठकार तर वेशभूषा सोनल खराडे यांची आहे.

शुक्रवारी (11 ऑगस्ट) दुपारी 4.15 वाजता गडकरी रंगायतन, ठाणे आणि शनिवारी (12.ऑगस्ट) दु. 4:30 वाजता सावित्रीबाई फुले, डोंबिवली येथे या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत. त्यामुळे सर्वींचे डोळे या नाटकाकडे लागले आहेत. (Actors Anita Date and Sagar Deshmukh, Pushkaraj Chirputkar play Kirkol Navare to meet the audience)

अधिक वाचा- 
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली
काळजाला चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

हे देखील वाचा