Monday, June 24, 2024

अरे देवा! अक्षय कुमारचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच संकटात, ‘पृथ्वीराज’वरून उफाळला वाद

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतीक्षित ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट देशाच्या इतिहासातील महान योद्धा आणि राजा पृथ्वीराज यांच्या जीवनावर आधारित आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये या चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला आहे. करणी सेना आणि गुज्जरांनी चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला असून, इतिहासाशी छेडछाड केल्यास ते खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे.

‘या’ शीर्षकावर आहे करणी सेनेचा आक्षेप
यशराज फिल्म प्रॉडक्शनच्या आगामी ‘पृथ्वीराज’ या चित्रपटावर करणी सेनेसह गुज्जरांनी आक्षेप घेतला आहे. करणी सेनेने आक्षेप घेत म्हटले की, शेवटचे क्षत्रिय हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्यावर बनवला जाणाऱ्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयच्या या चित्रपटाचे शीर्षक फक्त ‘पृथ्वीराज’ आहे. जे एवढ्या मोठ्या योद्ध्यासाठी अजिबात आदरणीय नाही.

‘ही’ आहे करणी सेनेची मागणी
माध्यमांशी बोलताना, श्री राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंग मकराना म्हणाले की, “यापलीकडे चित्रपटात आणखी अपमानास्पद काय असेल याचा अंदाज लावता येतो. चित्रपटाचे शीर्षक पृथ्वीराज नसून, पृथ्वीराज चौहान असावे. शीर्षक बदलले नाही, तर आंदोलन करण्यात येईल.”

गुज्जरांनी दिला करणी सेनेला पाठिंबा
गुज्जर नेते हिम्मतसिंग गुज्जर म्हणाले की, “पण यावेळी केवळ करणी सेनेनेच आंदोलनाच्या मैदानात उडी घेतलेली नाही. राजस्थानमध्ये गुज्जर आरक्षणासाठी लढणाऱ्या गुज्जरांनीही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. पृथ्वीराज चौहान हे गुज्जर नव्हते, तर राजपूत होते, असे गुज्जरांचे म्हणणे आहे.”

‘ही’ आहे चित्रपटाची संपूर्ण टीम
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत संजय दत्त, सोनू सूद यांच्याही मुख्य भूमिका आहेत. मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मानुषी छिल्लर या चित्रपटात संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट बनत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा