Monday, July 1, 2024

‘टॅक्सी ड्रायव्हर’ ते अभिनयातील ‘देवता’! ‘या’ सिनेमाने रवींद्र महाजनी यांचा नऊ वर्षाचा संघर्ष संपवल

मराठी चित्रपट सृष्टीतील देखण्या आणि रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांच दु:ख निधन झाले आहे. त्याच्या जाण्याने सिनेसृष्टीव शोककाळा पसरली आहे. रवींद्र महाजनी यांचा मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील अंबी गावातील एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. रवींद्र महाजनी यांना दम्याचा त्रास होता. त्यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चलातर जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास.

अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचा जन्म कर्नाटतील बेळगावी येथे झाला होता. रवींद्र महाजनी यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी हे होते. त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते शाळेत असतना नाटक, एकांकीकेत खूप आवडीने सहभाग घ्यायचे. त्यावेळी इंटर सायन्सला रवींद्र महाजनी नापास झाले होते. त्यामुळे ते फार दुखावले गेले होते. तेव्हा रवींद्र महाजनी यांना त्यांच्या वडिलांनी बीए करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा रवींद्र महाजनी यांनी खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.

महाविद्यालयात शिकत असताना खालसा महाविद्यालयात प्रवेश घेतला यांची रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर, अशोक मेहता यांच्याशी ओशख झाली. त्यानंतर ते चांगले मित्र झाले. त्यावेळी या सर्व मित्रांनी आपण मोठे झाल्यावर कोणत्या क्षेत्रात करियर करायच हे आगोदरच ठरवल होत. शेखर कपूर यांनी दिग्दर्शन व्हायचं होत. रमेश तलवार, अवतार गिल आणि रवींद्र महाजनी यांनी अभिनेता व्हायचं होत. आणि रॉबिन भट्ट यांनी लेखन बनायचं होत. तर अशोक मेहता यांनी कॅमेरामन बनायच होत. विशेष म्हणजे हे सर्व मित्र पुढे गेल्यानंतर आवडत्या क्षेत्रात काम करत होते.

शिक्षण पुर्ण झाल्यावर रवींद्र महाजनी यांचा कल अभिनय क्षेत्राकडे झुकला. पण यांचवेळी अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्याचे कुटुंब आर्थिकरित्या कोसळून गेले. तेव्हा कुटुंबाची जबाबदारी सगळी रवींद्र महाजनी यांच्यावर पडली. घर चालवण्यासाठी रवींद्र महाजनी यांनी टॅक्सी चालवण्यास सुरूवात केली. पण त्यावेळी नातेवाईकांनी रवींद्र महाजनी टोमणे मारण्यास सुरूवात केली होती. पण कोणाचाही विचार न करता ते त्यांच काम करत राहीले. (The tough life journey of famous actor Ravindra Mahajani)

अधिक वाचा- 
Breaking! देवता चित्रपटातील नायक, प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, बंद घरात सापडला मृतदेह
काजोलने पापाराझीबद्दल केले खळबळजनक विधान; अभिनेत्री म्हणाली, ‘मी पोलिसात तक्रार केली असती तर..’

हे देखील वाचा