काय सांगता! ‘द अंडरटेकर’ने अक्षय कुमारला दिले दोन हात करण्याचे चॅलेंज; थक्क झालेल्या अक्षयने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया


बॉलिवूड खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेक वर्षापासून त्याच्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट म्हणजे ‘खिलाडीयों के खिलाडी.’ या चित्रपटाला नुकतेच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकांना असे वाटत होते की, या चित्रपटात जो फाईट सीन होता, तो सीन द अंडरटेकर सोबत केला होता. परंतु नुकतेच अभिनेत्याने हा गैरसमज दूर केला आहे. आता जेव्हा २५ वर्षांनी ही गोष्ट समोर आली, तेव्हा डब्ल्यूडब्ल्यूई मधील खऱ्या अंडरटेकरने सर्वांसमोर त्याला चॅलेंज दिले आहे. जे ऐकून स्वता: अक्षय कुमारही हैराण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या ‘खिलाडीयों की खिलाडी’ या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानंतर अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक मिम शेअर करून या गोष्टीचा खुलासा केला आहे की, या चित्रपटात त्याची फायटिंग खऱ्या अंडरटेकर सोबत झाली नव्हती. त्याने सांगितले की, त्याच्या सोबत या चित्रपटात ब्रायन ली फायटिंग करत होता. ज्याने अंडरटेकरची भूमिका निभावली होती.

अक्षय कुमारच्या ट्वीट नंतर द अंडरटेकरने अक्षय कुमारला चॅलेंज करत लिहिले आहे की, “आता खऱ्या मॅचसाठी तू तयार असशील तर सांग मला.” अंडरटेकरने केलेली ही कमेंट बघून अक्षय कुमारने त्याला उत्तर दिले की, “मला आधी माझा इन्शुरन्स पाहुदे मग मी तुला सांगतो.” (The Undertaker challenge to akshy kumar for fighting akshy kumar says let mi chEck my insurance)

अक्षय कुमारने दिलेले हे उत्तर त्याच्या चाहत्यांना  खूपच आवडले आहे. लोकांचे असे म्हणणे आहे की, आता एवढ्या वर्षानंतर त्याने ही गोष्ट सांगितली आहे, तर आता खऱ्या अंडरटेकरसोबत दोन हात झालेच पाहिजे. तर काही लोक असे म्हणत आहेत की, “जर त्याने असे केले तर कदाचित त्याची हाड देखील सोडणार नाही.”

अक्षय कुमारचा हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने अनेक खतरनाक सीन दिले होते. या चित्रपटात त्याच्यामध्ये आणि अंडरटेकरमध्ये खतरनाक भांडण झाली होती. या चित्रपटात अंडरटेकरची भूमिका निभावणारा ब्रायन ली हा अंडरटेकरचा चुलत भाऊ आहे. तो देखील एक प्रोफेशनल रेसलर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-क्रेन क्रॅश अपघातात कशीबशी वाचली होती काजल अग्रवाल; तुमच्याही अंगावर काटा आणेल तो थरारक किस्सा

-हीच आहे का ती ‘सावळ्या कुंभारा’ची ‘गंगी’? राजश्री लांडगेचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-‘इंडियन आयडल’मधील शनमुखप्रिया सतत होतेय ट्रोलिंगची शिकार, म्हणाली, ‘माझ्यावर चांगला परफॉर्मन्स करण्याचा…’


Leave A Reply

Your email address will not be published.